Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आश्रमशाळा कर्मचार्‍यांचा जुन्या पेन्शनसाठी संप सुरूच

अकोले/प्रतिनिधी ः राज्यातील आश्रमशाळा कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व शाळेेची वेळ बदल करू नये, या प्रमुख मागण्यांंसह इतर मागण्या मं

..तर मग, मुख्यमंत्री व मंत्र्यांचे मानधन बंद करा…
नगर शहराची पाण्याची चिंता मिटणार… ५० लाख लिटरची नवीन टाकी होणार कार्यान्वित LokNews24
मढीच्या कानिफनाथांचा केला चक्क वाढदिवस…

अकोले/प्रतिनिधी ः राज्यातील आश्रमशाळा कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व शाळेेची वेळ बदल करू नये, या प्रमुख मागण्यांंसह इतर मागण्या मंजूर करणेसाठी मंगळवारपासून राज्यातील विविध कर्मचारी संघटनांसह सिटु प्रणित आदिवासी विकास विभाग आश्रम शाळा शिक्षक कर्मचारी संघटनेनेही राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला असून, हा संप गुरुवारी देखील सुरुच होता.
अहमदनगर जिल्ह्यातील बावीस आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दुपारी एक ते  तीन दरम्यान आयोजित धरणे निदर्शने आंदोलनात राजूर येथे सहभागी झाले होते.राजूूर प्रकल्प कार्यालय परिसरातुन कर्मचार्‍यांची जनजागृती रॅली काढण्यात आली होती सदर रॅलीचे रुपांतर काार्यालयसमोरच सभेत झाले.  जुन्या पेन्शनसाठी मोठ्या प्रमाणात जन आंदोलन सध्या नगर जिल्ह्यात चालू असून पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील सगळ्यात प्रशासकीय व्यवस्था कोलमडल्याचे मत विठ्ठल म्हशाळ, प्रमोद राऊत, कैलास सोनार, पंकज दुरगुडे, गंगाराम करवर, मनोज सोनवणे, शिवराज कदम यांच्यासह अनेक मान्यवरांनी मांडले. धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रकल्पस्तरीय कार्यलयीन कर्मचारी संघटनेचे राजेंद्र मंडलीक, कुलदीप पाटील, अभिमान नाईकनवरे,शाम कांबळे, साळवी,अमोल जाधव, शेंडे, तसेच इतर कर्मचारी,राजूूर प्रकल्प अधिक्षक संघटनेचे शालकीराम यादव, समाधान सुर्यवंशी, कैलास सोनार. शिक्षक संघटणेचे विविध कार्यकर्तेसह जिल्ह्यातील बावीस आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS