Homeताज्या बातम्याक्रीडा

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणित विजय

कॅप्टन सूर्यकुमार यादव याचं शतक, यशस्वी जयस्वाल याच्या अर्धशतकानंतर कुलदीप यादव याने घेतलेल्या 5 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने तिसऱ्या आणि निर्

माजी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये आयोजित कुस्ती स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया विरोधात कुस्तीपटूंचा निषेध
श्रीलंकेला प्रयान करण्यापूर्वी गौतमचा पत्रकारांशी गंभीर सामना

कॅप्टन सूर्यकुमार यादव याचं शतक, यशस्वी जयस्वाल याच्या अर्धशतकानंतर कुलदीप यादव याने घेतलेल्या 5 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने तिसऱ्या आणि निर्णायक टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 106 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांपुढे दक्षिण आफ्रिकेने 13.5 ओव्हरमध्ये 95 धावांवर गुडघे टेकले. टीम इंडिया या विजयासह मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवण्यात यशस्वी ठरली.

मुकेश कुमार याने मॅथ्यू ब्रेट्झके याला 4 धावांवर आऊट करुन दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका दिला. तिथून टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला ठराविक अंतराने झटके देत ऑलआऊट केलं. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलर याने सर्वाधिक 35 धावा केल्या. कॅप्टन एडन मारक्रम याने 25 धावांचं योगदान दिलं. तर डोनोव्हन फरेरा 12 रन्स करुन माघारी परतला. या तिघांव्यतिरिक्त 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर दोघे आले तसेच परत गेले. तर तरबेज शम्सी हा 1 रनवर नाबाद राहिला. टीम इंडियाकडून कुलदीप यादव याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर रवींद्र जडेजा याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंह या दोघांना 1-1 विकेट मिळाली. त्याआधी सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी केलेल्या तडाखेबंद खेळीमुळे टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 201 धावा करता आल्या. सूर्यकुमार यादव याने 100 धावांची शतकी खेळी केली. तर यशस्वी जयस्वाल याने 60 धावा केल्या. तिलक वर्मा 14 धावा करुन माघारी परतला. तर इतरांना विशेष काही करता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि लिझाद विल्यम्स या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर नांद्रे बर्गर आणि तबरेझ शम्सी या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

COMMENTS