Homeताज्या बातम्यादेश

मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नव्हे, स्मृती इराणींचे राज्यसभेत वक्तव्य

नवी दिल्ली प्रतिनिधी - केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी ‘मासिक पाळी’ साठी भरपगारी सुट्टी देण्यावरून मोठे विधान केले आहे.

शेवगावमध्ये 23 नोव्हेंबरला मनोज जरांगे यांची विराट सभा
4 तासात 22 जणांना ठोकल्या बेड्या
बलात्कार पीडितेने पोलिस ठाण्यातच केले विष प्राशन

नवी दिल्ली प्रतिनिधी – केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी ‘मासिक पाळी’ साठी भरपगारी सुट्टी देण्यावरून मोठे विधान केले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे सदस्य मनोज कुमार झा यांनी देशातील मासिक पाळी स्वच्छता धोरणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना इराणी राज्यसभेत बोलत होत्या. यावेळी, मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही त्यासाठी भरपगारी सुट्टीच्या कोणत्याही विशिष्ट धोरणाची हमी देऊ नये असे इराणी यांनी म्हटले आहे. “एक मासिक पाळी येणारी स्त्री म्हणून मी सांगू शकते की, मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही, हा स्त्रियांच्या जीवन प्रवासाचा एक नैसर्गिक भाग आहे. ज्यांना मासिक पाळी येत नाही अशा व्यक्तीचा मासिक पाळीबद्दल विशिष्ट दृष्टिकोन असतो, फक्त म्हणूनच स्त्रियांना समान संधी नाकारल्या जातात अशा समस्या आपण मांडू नयेत. मासिक पाळीला सुट्टीची गरज नाही गेल्या आठवड्यात, काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, इराणी यांनी लोकसभेत सांगितले होते की, “सर्व कामाच्या ठिकाणी भरपगारी मासिक पाळीच्या रजेची अनिवार्य तरतूद करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही”. तर बुधवारी सभागृहात सादर केलेल्या लेखी उत्तरात इराणी म्हणाल्या की, “ अगदी काहीच महिला/मुली गंभीर डिसमेनोरिया किंवा तत्सम तक्रारींनी ग्रस्त आहेत, आणि यापैकी बहुतेक प्रकरणे औषधोपचाराने नियंत्रित करता येतात.”

COMMENTS