Homeताज्या बातम्यासंपादकीय

प्रदूषणाचे दिवाळे

राजधानी दिल्लीनंतर सर्वाधिक प्रदूषण मुंबई शहरामध्ये दिसून येत आहे. मुंबईनंतर पुणे, पिंपरी चिंचवडसह अनेक जिल्ह्यात हवेची गुणवत्ता ढासाळतांना दिसून

भाजपला बोध
तलाठी परीक्षेतील नवा घोळ
धरणग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत…  

राजधानी दिल्लीनंतर सर्वाधिक प्रदूषण मुंबई शहरामध्ये दिसून येत आहे. मुंबईनंतर पुणे, पिंपरी चिंचवडसह अनेक जिल्ह्यात हवेची गुणवत्ता ढासाळतांना दिसून येत आहे. श्‍वसनाचे समस्या, खोकल्याच्या समस्यांना अनेकांना होत असतांना देखील आपण पर्यावरणाकडे गांभीर्याने बघायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. कारण एकट्या मुंबई शहराने दिवाळीमध्ये तब्बल 500 कोटींचे फटाके फोडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. हल्लीच्या काळात  दिवाळी म्हणजे फटाके असे जणू समीकरणच होतांना दिसून येत आहे. दरवर्षी फटाक्यांच्या खरेदीत वाढ होत असल्याचे दिसते. पर्यावरणपूरक आणि फटाकेमुक्त दिवाळीचा नारा देण्यात येत असला तरी यंदा त्याचा फारसा काही परिणाम झाल्याचे दिसले नाही. हवेची गुणवत्ता ढासाळत असतांना, फटाके फोडण्यासाठी अटकाव होतांना दिसून येत नाही. खरंतर राज्य सरकारने फटाके फोडण्यावर बंदी घालण्याऐवजी, उच्च न्यायालयाने निर्देश देण्याऐवजी नागरिकांनी स्वतःहून या बाबी पाळण्याची गरज आहे. फटाके फोडून आपण प्रदूषण वाढवत असल्याची जाणीव का होत नाही. खरंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विषारी रसायने असलेल्या फटाक्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. फटाके फोडण्यासाठी रात्री 8 ते 10 अशी वेळ निर्धारित केली गेली आहे. तरीदेखील या वेळेव्यतिरिक्त फटाके सर्रास फोडण्यात येत आहे. त्याचबरोबर बंदी असलेल्या बेरियम रसायनाचा वापर करण्यात आलेल्या फटाक्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी दिवाळीच्या दिवसांत लगेचच हवा प्रदूषणात वाढ झाल्यामुळे चिंताजनक एक्यूआयची नोंदही झाली आहे. एकट्या मुंबई शहरामध्ये जर 500 कोटींचे फटाके फोडण्यात आले तर, राज्यातील इतर शहरामध्ये आणि संपूणृ देशभरात किती फटाके फोडण्यात आले असतील, त्याची गणतीच नाही. दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे पुन्हा एकदा हवेची गुणवत्ता खालावल्याचे दिसून येत आहे. राजधानी दिल्लीत काही दिवसांपूर्वीच प्रदूषणामुळे शाळा बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली होती, त्याचबरोबर सरकारी अधिकार्‍यांना घरून काम करण्याचे निर्देश द्यावे लागले होते, त्यामुळे अशी नामुष्की उद्या मुंबईकरांवर देखील ओढवू शकते. त्यामुळेे मुंबईकरांनी गांभीर्याने काही बाबी घ्यायला हव्यात. त्याचबरोबर सरकारला आणि प्रशासनाला देखील गांभीर्याने पाऊले उचलण्यास भाग पाडायला हवे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत रस्त्यांवर उठणार्‍या धुळीवर उपाययोजना म्हणून पाणी मारण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर अनेक जिल्ह्यात पाऊस पडल्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारली होती. मात्र सुधारलेली गुणवत्ता दिवाळीच्या फटाक्यांनी पुन्हा एकदा खाली आणून ठेवली आहे. त्यामुळे  मोठया प्रमाणात सुरू असलेली बांधकामे, वाहनांचा धूर यामध्ये फटाक्यांच्या धुराची भर पडल्यामुळे दिवाळीमध्ये प्रदूषण नेहमीच वाढते. हे लक्षात घेऊन उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर वेळेचे बंधन घातले होते. मात्र ही मर्यादा कुठेही पाळली गेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई, नागपूर, पुणे ही महानगरेही त्याला अपवाद नाहीत. प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. मात्र दिवाळीच्या प्रदूषणात या सर्वांची वाट लागली. खरंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर विविध भागात प्रकल्प कामे, मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. मोठया प्रमाणात सुरू असलेली बांधकामे, वाहनांचा धूर यामध्ये फटाक्यांच्या धुराची भर पडल्यामुळे दिवाळीमध्ये प्रदूषण नेहमीच वाढते. हे लक्षात घेऊन उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर वेळेचे बंधन घातले होते. मात्र ही मर्यादा कुठेही पाळली गेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई, नागपूर, पुणे ही महानगरेही त्याला अपवाद नाहीत. प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. मात्र त्याचे सातत्याने उल्लघंन होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अजूनही प्रदूषण रोखण्याकडं आपण गांभीर्यानं बघतांना दिसून येत नाही.

COMMENTS