Homeताज्या बातम्यामनोरंजन

तमन्ना भाटिया लवकरच विजय वर्मासोबत करणार लग्न ?

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा या कपलची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. सध्या हे बॉलिवूडमधील सर्व

तमन्नाचा १८ वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल
‘बाहुबली’ फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया लवकरच घेणार सात फेरे;
तमन्ना भाटीयाने अफेअरच्या चर्चांना दिला पूर्णविराम, विजयसोबतच्या प्रेमाची दिली कबुली

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा या कपलची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. सध्या हे बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असलेले कपल आहे. तमन्ना भाटिया आणि विजय वर्माच्या डेटिंगच्या बातम्यांनंतर दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र स्पॉट झाले आहेत. पण या कपलने अद्याप आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली नाही. हे कपल सोशल मीडियावर देखील एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात. अलीकडेच तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले. आता या सगळ्यानंतर तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या लग्नाच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. हे कपल लग्नाचे प्लॅनिंग करत असल्याचे सांगितले जात आहे. या चर्चा होण्यामागचे कारण देखील समोर आलं आहे.तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अशामध्ये तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी लग्न करावे असे त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. ते या कपलच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच एक मीडिया रिपोर्ट समोर आला आहे. ज्यामध्ये तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या लग्नाबाबत अपडेट समोर आले आहेत. तमन्ना आणि विजयचे कुटु्ंबींय लग्नासाठी दोघांनाही प्रेशराइज करत असल्याची माहिती समोर आली आहे

COMMENTS