Homeताज्या बातम्यामनोरंजन

माधुरी दिक्षीत लोकसभेच्या रिंगणात ?

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूडची ‘धकधक गर्ल माधुरी दिक्षित ही एक अशी अभिनेत्री आहे जिने नेहमीच विविध धाटणीच्या भूमिकांद्वारे आणि तिच्या अप्रतिम नृ

मराठमोळी चंद्रा- चंद्रमुखीची जबरदस्त जुगलबंदी
‘दिल की धडकन’ माधुरी दीक्षित पहिल्यांदाच वेगळ्या भूमिकेत
माधुरी दिक्षीत, उज्ज्वल निकम भाजपकडून लढणार लोकसभा

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूडची ‘धकधक गर्ल माधुरी दिक्षित ही एक अशी अभिनेत्री आहे जिने नेहमीच विविध धाटणीच्या भूमिकांद्वारे आणि तिच्या अप्रतिम नृत्यकौशल्याने चाहत्यांच्यावर मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे. तिचं नृत्यकौशल्य आणि दिलखेचक अदा पाहून आजही चाहत्यांच्या हृदयाची ‘धकधक’ वाढते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आता माधुरी दीक्षित निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 23 सप्टेंबर दिवशी केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबईत आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थळी याठिकाणीही झालेल्या चर्चेत माधुरीला लोकसभा निवडणुकीचे तिकिट देण्याची चर्चा खूपच रंगत होती. यामुळे माधुरी भाजपच्या तिकिटावर मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळाली आहे. याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मुंबईमधील एकूण तीन मतदार संघावर भाजपचे वर्चस्व आहे. त्यात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून तिला तिकिट मिळण्याची सूत्राची माहिती आहे. याअगोदर तिने पुण्यातील जागेसंदर्भात देखील चांगलीच चर्चा रंगली होती. सध्या खासदार गजानन किर्तिकर आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यात जोरदार वादाची ठिणगी पडल्याचे बघायला मिळत आहे. त्यावर आता पडदा टाकण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केले असून त्यांना यश मिळाले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तिकर यांच्याविरोधामध्ये ही जागा भाजपला मिळाल्यास तेथून माधुरीला तिकिट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS