Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाल महालात चित्रीकरण करणार्‍यांविरोधात कडक कारवाई करा : खा. उदयनराजे

सातारा / प्रतिनिधी : लालमहाल ही वास्तू नाच-गाण्यांच्या चित्रीकरणाची जागा नाही. कोणतेही ऐतिहासिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक प्रसंगाशी संबंधित चित्र

हनुमान चालीसासह भोंग्यांची भाषेमुळे समाजात तेढ निर्माण : ना. जयंत पाटील
औंधच्या तनपुरे कुटुंबियांकडून गाईच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम
शामगाव येथे पिण्याच्या पाण्याचे एटीएम

सातारा / प्रतिनिधी : लालमहाल ही वास्तू नाच-गाण्यांच्या चित्रीकरणाची जागा नाही. कोणतेही ऐतिहासिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक प्रसंगाशी संबंधित चित्रीकरणास आमचा विरोध नाही. मात्र, या वास्तूचा इतिहास लक्षात घेऊन चित्रीकरण करणे गरजेचे आहे. केवळ व्यावसायिक हेतूने कोणी या वास्तूचा वापर करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे संबंधित दोषींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, असे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले, की लालमहाल ही ऐतिहासिक वास्तू असून, या वास्तूला फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे लालमहाल हा संपूर्ण शिवप्रेमींची अस्मिता आहे. या वास्तूतील छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँ यांच्या शिल्पाचे पावित्र्य लक्षात घेता, ही वास्तू सिनेमातील नाच-गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नाही. याचे भान संबंधितांनी ठेवायला हवे होते. ज्यांनी कोणी हे चित्रीकरण केले. त्यांनी ते सिनेमातून प्रदर्शित करू नये. तसेच हे चित्रीकरण करण्यास ज्या अधिकार्‍यांनी परवानगी दिली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.
मुळात लाल महाल ही वास्तू पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. या चित्रीकरणासाठी संबंधितांनी महापालिकेची परवानगी घेतली आहे का? महापालिकेच्या कोणत्या अधिकार्‍यांने ही परवानगी दिली? तसेच जर परवानगी दिली असेल कर कोणत्या अटी व शर्तींवर परवानगी दिली? याची चौकशी झाली पाहिजे. याच वास्तूत चित्रीकरण करण्याचा नेमका हेतू काय आहे. त्याचबरोबर जे चित्रीकरण झाले असेल ते तपासून पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS