Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आश्‍वासनांचा वन्यजीव कार्यालयास विसर; ग्रामस्थांचे वन्यजीव कार्यालयासमोर उपोषण

वारणावती : शिराळा येथील वन्यजीव कार्यालयासमोर ग्रामस्थांनी विविध मागण्यासाठी सुरु केलेले आमरण उपोषण. (छाया : आनंदा सुतार, खुजगांव.) वन्यजीव विभागा

अवकाळी पावसाने राहुरी तालुक्यातील 14 गावे बाधित
नैसर्गिक शेती यापुढे कृषी शिक्षणाचा भाग असेल : कृषीमंत्री तोमर
नुकसानग्रस्त ऊसतोड मजुरांच्या मदतीला कृष्णा कारखाना धावला..!

न्यजीव विभागाने एनओसी दिल्यास अवघ्या पंधरा दिवसात हे प्रकरण निकालात काढता येईल.
गणेश शिंदे (तहसिलदार-शिराळा)

शिराळा / प्रतिनिधी : मणदूर, धनगरवाडा, विनोबाग्राम, खुंदलापूर, जानाईवाडी येथील ग्रामस्थांच्या प्रलंबित जमिनींसंदर्भात प्रजासत्ताकदिनी काढलेल्या मोर्चात वन्यजीव प्रशासनाने दिलेल्या आश्‍वासनांची कोणतीही पूर्तता केली नसल्याने, वन्यप्राण्यांकडून वारंवार होणार्‍या नुकसान भरपाई बाबतीत कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने व वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांच्याकडून ग्रामस्थांना सातत्याने मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीत कोणताही बदल होत नसल्याने येथील ग्रामस्थांनी वन्यजीव कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मणदूर, धनगरवाडा, विनोबाग्राम खुंदलापूर, जानाईवाडी, मिरुखेवाडी, जाधववाडी ग्रामस्थांच्या जमिनीसंदर्भात येथील ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी मोर्चा काढला होता. वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक तथा संचालक समाधान चव्हाण व प्रादेशिक वन विभागाचे उपविभागीय अधिकारी विजय माने यांनी त्यावेळी आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य करत अवघ्या दोन महिन्यात कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले होते.
मात्र, प्रशासनाने दिलेल्या आश्‍वासनांची अद्याप कोणतीही पूर्तता केली नाही. तीन महिने उलटून गेले तरी वन्यजीव प्रशासन अद्याप झोपेतून जागे होत नाही. वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे याच्या मुजोरीत दिवसेंदिवस अधिकच भर पडत आहे. याच्या निषेधार्थ आजपासून मागण्या होईपर्यंत सरपंच व ग्रामस्थांतर्फे बेमुदत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे मणदूर गावचे सरपंच वसंत पाटील यांनी आंदोलनादरम्यान सांगितले.

COMMENTS