Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवशाही सरपंच संघाकडून स्व. शिवाजीराव देसाई आदर्श ग्रामसह आदर्श सरपंच पुरस्कार

दौलतनगर / वार्ताहर : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव देसाई यांच्या पुण्यतिथी दिवशी दि. 12 जुलै 2021 रो

मेढ्यातील व्यापार्‍यांकडून फुटपाथवरील अतिक्रमणे हटवण्याची मागणी
इस्लामपूर शहरातील 3 कोटी 45 लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन
माध्यमे समाजासह राज्यकर्त्यांना दिशादर्शक : ना. चंद्रकांत पाटील

दौलतनगर / वार्ताहर : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव देसाई यांच्या पुण्यतिथी दिवशी दि. 12 जुलै 2021 रोजी ना. शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली शिवशाही सरंपच संघ पाटण विधानसभा या सरपंच संघाची स्थापना करण्यात आली. यंदा शिवशाही सरपंच संघाचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त ना. शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांचे संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व पातळीवर चांगले काम करणार्‍या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना स्व. शिवाजीराव देसाई शिवशाही आदर्श ग्राम पुरस्कार व पहिल्या तीन सरपंचांना स्व. शिवाजीराव देसाई शिवशाही आदर्श सरपंच पुरस्काराने स्व. शिवजीराव देसाई यांच्या जयंती दिवशी दि. 20 नोव्हेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात येणार असल्याची माहिती शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी आहे.
पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, ना. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन यशराज देसाई यांच्या संकल्पनेतून पाटण विधानसभा क्षेत्रात सर्व पातळीवर चांगले काम करणार्‍या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना स्व. शिवाजीराव देसाई शिवशाही आदर्श ग्राम पुरस्कार व सर्व पातळीवर चांगले काम करणार्‍या पहिल्या तीन सरपंचांना स्व. शिवाजीराव देसाई शिवशाही आदर्श सरपंच पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे. आदर्श ग्रामपंचायतींना ना. शंभूराज देसाई यांच्याकडून गावातील मुलभूत विकास कामासाठी प्रथम क्रमांक 20 लाख, द्वितीय क्रमांक 15 लाख व तृतीय क्रमांक 10 लाख याप्रमाणे निधी देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे प्रत्यक्ष कामकाजाचे परिक्षण हे निवड समितीकडून दि. 10 नोव्हेंबर पासून करण्यात येणार आहे. तरी पाटण विधानसभा मतदार संघातील आतापर्यंत स्व. शिवाजीराव देसाई शिवशाही आदर्श ग्राम स्पर्धेसाठी सहभाग नोंदविलेल्या 72 तर स्व. शिवाजीराव देसाई शिवशाही आदर्श सरपंच पुरस्कार स्पर्धेसाठी सहभाग नोंदविलेल्या 52 ग्रामपंचायतींनी शिवशाही सरपंच संघाच्या तालुका कार्यकारीणीशी संपर्क साधून स्पर्धेसाठी तयारी करावी, असे आवाहन शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी केले आहे.

COMMENTS