Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वर्ण डरांगे बारावीत सर्वप्रथम तर गणितात जिल्हयात प्रथम

कोपरगाव तालुका ः तालुक्यातील संवत्सर रामवाडी परिसरातील स्वर्ण तुकाराम डरांगे हा विद्यार्थी इयत्ता बारावीच्या परिक्षेत 89.67 टक्के गुण मिळवून विद्

सोनेवाडी विविध कार्यकारी सोसायटीवर पांडुरंग काळे व संपत दळवी बिनविरोध
मनपा निवडणुकांतून ओबीसींचे होणार नुकसान; प्रा. शिंदे यांचा महाविकासवर ठपका
खडकी आगीच्या दुर्घटनेतील कुटुंबीयांना मदत मिळवून द्या

कोपरगाव तालुका ः तालुक्यातील संवत्सर रामवाडी परिसरातील स्वर्ण तुकाराम डरांगे हा विद्यार्थी इयत्ता बारावीच्या परिक्षेत 89.67 टक्के गुण मिळवून विद्यालयात तर गणित विषयात 100 पैकी 98 गुण मिळवून जिल्हयात  प्रथम आला आहे. तो सुप्रसिध्द गायक तुकाराम डरांगे यांचा मुलगा आहे. चि. स्वर्ण डरांगे हा उक्कडगांव येथील शिवअमृत कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान) येथे शिकत होता. त्याची इंजिनियरींग शिक्षणात रूची असुन नामांकित अभियंता बनून देशसेवा करायची हे त्याचे उददीष्ट आहे. स्वर्ण डरांगे यास शिक्षण संस्थेचे संस्थापक शिवाजी लावरे, गणित विषयाचे तज्ञ प्रा. घोणसे (अहमदनगर), प्राचार्य एस. बी. भुजाडे, विभागप्रमुख आर. एम. दुपके यांच्यासह अन्य शिक्षकांसह, चिरंजीव स्वर्ण यांच्या मातोश्री शिक्षिका असल्याने त्यांचेही विशेष मार्गदर्शन त्याला लाभले, त्याच्या यशाबददल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

COMMENTS