दारुसाठी पत्नीस संपवण्याची धमकी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दारुसाठी पत्नीस संपवण्याची धमकी

अहमदनगर/प्रतिनिधी : दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीला संपविण्याची धमकी दिल्याची घटना नगरमधील सिव्हिल हॉस्पिटल-डॉक्टर कॉलनी येथे घडली. याबाबत पत्

* अतिरिक्त बिल वसूल करणाऱ्या दवाखान्यांना दणका l पहा LokNews24*
आधारचा गैरवापर केल्यास होऊ शकतो एक कोटींचा दंड
अहमदाबाद-तिरुचिरापल्ली साप्ताहिक विशेष रेल्वे

अहमदनगर/प्रतिनिधी : दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीला संपविण्याची धमकी दिल्याची घटना नगरमधील सिव्हिल हॉस्पिटल-डॉक्टर कॉलनी येथे घडली. याबाबत पत्नीने तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश आनंद वाघचौरे (रा. डॉक्टर कॉलनी, सिव्हील हॉस्पिटल, अ.नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. त्याची पत्नी सुरेखा निलेश वाघचौरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रविवार, 27 फेब्रुवारी रोजी दुपारी फिर्यादीच्या राहत्या घरी ही घटना घडली. निलेश वाघचौरे हा पत्नी सुरेखा वाघचौरे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. त्यांनी पैसे न दिल्याने निलेश याने शिवीगाळ करून मी तुला जिवंत सोडणार नाही. तुझ्या नोकरीचा रुबाब मला दाखवू नको, संपवून टाकील अशी धमकी दिली तसेच लोखंडी गजाने मारहाण केली. मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दगडाने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील कारवाई तोफखाना पोलिस करीत आहेत.

COMMENTS