Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वाभिमानीची वाळवा-पलूसमध्ये मोटरसायकल रॅली

इस्लामपूर / प्रतिनिधी : एक रकमी एफआरपी मिळावी, वजनातील काटामारी थांबावी आणि टोळीला द्यावे लागणारे पैसे देण्याची पध्दत बंद व्हावी. आदीसह अन्य मागण

नुकसानग्रस्त पिकांच्या भरपाईसाठी वडूजमध्ये शिवसेनेचे आंदोलन
केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे साखर उद्योगाला फटका : पी. आर. पाटील
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीतुन रोजगार निर्मिती

इस्लामपूर / प्रतिनिधी : एक रकमी एफआरपी मिळावी, वजनातील काटामारी थांबावी आणि टोळीला द्यावे लागणारे पैसे देण्याची पध्दत बंद व्हावी. आदीसह अन्य मागण्यासाठी वाळवा आणि पलूस तालुक्यात मोटर सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी गांधीगिरी मार्गाने ऊसतोड घेवू नका, असे आवाहन करून शेतकर्‍यांना गुलाबाचे फुल देण्यात व ऊसतोड रोखण्यात आली.
रॅलीचे नेतृत्व स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले. एकरकमी एफआरपी न दिल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी खराडे यांनी दिला.
रॅलीला प्रारंभ आष्टा येथील बस स्टँड चौकातून झाली. एक रकमी एफआरपी मिळाली पाहिजे, कोण म्हणतोय देत नाय घेतल्याशिवाय राहत नाही, घामाचे दाम मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. ही रॅली आष्टा मार्गे दुधगाव, सर्वोदय कारखाना, बावची, बागणी पडवळवाडी, हुतात्मा कारखाना वाळवा, नवेखेड, पुणदी किर्लोस्करवाडी, क्रांती कारखाना, कुंडल, दह्यारी, तुपारी, ताकारी, कराड रस्ता, बहे मार्गे राजारामबापू साखर कारखाना इस्लामपूर येथे रॅलीची सांगता झाली.
रॅलीत पोपट मोरे, भागवत जाधव, बाबा सांद्रे, जगन्नाथ भोसले, संजय बेले, सुदर्शन वाडकर, गुंफा आवटी, शहाजी पाटील, प्रकाश देसाई, प्रताप पाटील, अभिनंदन नवले, प्रवीण पाटील, रमेश पाटील, राजेंद्र पाटील, संदीप शीरोट, काशिनाथ निंबाळकर, प्रभाकर पाटील, तानाजी साठे, अरुण कवठेकर, अमर पाटील, रविकिरण माने, संतोष शेळके, राजेंद्र माने, मारुती डंगारणे, बाळासाहेब जाधव, राजाभाऊ परीट, तानाजी शेळके, पंडित सपकाळ, राम पाटील, मानसिंग पाटील, शिवलिंग शेटे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS