Homeताज्या बातम्यादेश

दिल्लीच्या निवारागृहात 20 दिवसांत 13 मुलांचा संशयास्पद मृत्यू

नवी दिल्ली / प्रतिनिधी : दिल्ली सरकारतर्फे दिल्लीच्या रोहिणी परिसरात दिव्यांग मुलांसाठी चालविल्या जाणार्‍या आशा किरण या निवारागृहात मागच्या 20 दि

मनपाच्या प्रस्तावित तिप्पट घरपट्टीला कामगार संघटनेनेही केला विरोध
संविधान लोकशाही प्रजासत्ताकाचा भक्कम पाया : राष्ट्रपती मुर्मू
काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ ७ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात. 

नवी दिल्ली / प्रतिनिधी : दिल्ली सरकारतर्फे दिल्लीच्या रोहिणी परिसरात दिव्यांग मुलांसाठी चालविल्या जाणार्‍या आशा किरण या निवारागृहात मागच्या 20 दिवसांत 13 मुलांचा मृत्यू झाला असल्याची बाब समोर आली आहे. उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी केलेल्या चौकशीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच जानेवारी 2024 पासून आतापर्यंत एकूण 27 मृत्यू झाले आहेत. त्यामुळे निवारागृहातील व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले असून भाजपाने येथील हलाखीच्या परिस्थितीवर टीका केली आहे.

आशा किरण निवारागृहातील मुलांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी मृत्यूचा आकडा कमी असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे सांगितले जात आहे. निवारागृहात पिण्याच्या पाण्याचा दर्जा खालावलेला आहे. त्यामुळे कदाचित हे मृत्यू झाले असावेत, असा संशय उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने निवारागृहात सत्य पडताळणी करणारे पथक पाठवले आहे. या प्रकरणी आम आदमी पक्षावर जोरदार टीका केली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या, अनेक वर्षांपासून आशा किरण निवारागृहाची जबाबदारी दिल्ली राज्य सरकारकडे असल्याने आता आम्ही सर्व आशा गमावली आहे. याठिकाणी मुलांचा छळ होत असल्याने त्यांचा मृत्यू होत आहे. पण दिल्ली सरकार याबद्दल काहीच करत नाही. आम्ही याची दखल घेतली असून सत्य पडताळणी करणारे पथक पाठवले आहे.

आम आदमी पक्षाच्या मंत्री आतिशी सिंह यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. राज्याच्या महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल 48 तासात मिळेल. आतिशी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, जानेवारी 2024 पासून आशा किरण निवारागृहात 14 मृत्यू झाले आहेत. तसेच या मृत्यूंना जबाबदार असणार्‍या सर्वांवर निष्काळजीपणाबद्दल कारवाई करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी त्यांनी शिफारशी मागितल्या आहेत.

COMMENTS