Homeताज्या बातम्यादेश

अजित पवारांसह 9 आमदारांचे निलंबन

राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाच्या बैठकीत निर्णय

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्षावर आणि चिन्हावर अजित पवार यांनी दावा करत आपणच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष

शिंदे-फडणवीस सरकारने कामांना स्थगिती देऊन काय मिळवले
नवी मुंबई विमानतळचा पहिला टप्पा मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणार
तिजोरीच्या चाव्या अजितदादांकडेच

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्षावर आणि चिन्हावर अजित पवार यांनी दावा करत आपणच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा केला आहे. तसे 40 आमदारांचे पाठिंब्याचे पत्रच त्यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे. मात्र राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाची राजधानी दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठक घेण्यात आली, यात अजित पवारांसह 9 आमदारांचे निलंबन करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
पक्षविरोधी कारवाई केल्याने सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबित करण्याचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत 8 ठराव करण्यात आले. अजित पवारांसोबत शपथ घेतलेल्या 9 आमदारांवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अपात्रतेची कारवाई केली होती. त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय राष्ट्रीय कार्यकरणीत झाल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धर्मराव आत्राम, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शरद पवार हेच राष्ट्रवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा ठराव यावेळी करण्यात आला. 2 खासदार आणि 9 आमदारांचे निलंबन करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. जे काही निर्णय आम्ही घेतले आहेत त्यामुळे आमची हिंम्मत वाढली असल्याचे यावेळी शरद पवार यांनी सांगितले.
कुणाला पंतप्रधान बनायचे असेल किंवा मुख्यमंत्री बनायचे असेल तर त्याच्याशी मला काही घेणेदेणे नाही, असा टोला शरद पवार यांनी अजित पवार यांना लगावला. आमचा निवडणूक आयोगावर विश्‍वास आहे. आम्हाला जे काही सांगायचे आहे ते निवडणूक आयोगासमोर सांगू. तिथे जी लीगल पोजिशन आहे ते पाहिल्यानंतर निर्णय होईल. पण तो निर्णय अनपेक्षित लागला तर आम्ही वेगळ्या ऑथिरिटीकडे सर्वोच्च न्यायालयातजाण्याचा विचार करु. पण तशी वेळ येईल, असे मला वाटत नाही, असे म्हणत शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे संकेत दिले आहेत.

वय कितीही झाले तरी काम करत राहणार – राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचा अध्यक्ष मीच असून, दुसरा कोणी काही बोलत असेल तर त्याला काही अर्थ नाही, असेही पवार पत्रकारांशी बोलतांना म्हणाले. अजित पवारांनी तुमच्यावर वैयक्तिक हल्ला चढवला, तुमचे वय झाले असे म्हटले, यावर काय सांगाल? असा प्रश्‍न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना मी 82 किंवा 92 वयाचा असेन तरी काम करत राहणार असे पवारांनी स्पष्ट सांगितले.

COMMENTS