Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पैशासाठी त्रास दिल्याने एकाची आत्महत्या : दोघांविरूध्द गुन्हा

अहमदनगर/प्रतिनिधी ः पैशासाठी फोन करून त्रास दिल्याने एकाने आत्महत्या केली. ही घटना नगर तालुक्यातील संभाजीनगर रोड वरील जेऊर बायजा बाईचे येथे घडली.

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या तरुणीची आत्महत्या
मुलीच्या प्रेमविवाहामुळे कुटुंबाची विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या
बांधकाम व्यावसायिकाची जिममध्ये आत्महत्या

अहमदनगर/प्रतिनिधी ः पैशासाठी फोन करून त्रास दिल्याने एकाने आत्महत्या केली. ही घटना नगर तालुक्यातील संभाजीनगर रोड वरील जेऊर बायजा बाईचे येथे घडली. अविनाश अशोक पवार (रा. जेऊर बायजाबाई, ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अविनाश यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश पाटील व राजू कचरे (दोघे रा. शेवगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मयताकडे सापडलेल्या चिठ्ठी मध्ये दोघांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. याबाबत मयत अविनाश यांचे भाऊ अजय अशोक पवार (रा.जेऊर बायजा बाई ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे भाऊ अविनाश पवार यांनी फोनवरून कर्ज घेतले होते. त्यापोटी महेश पाटील व राजू कचरे यांना अविनाश यांनी वेळोवेळी पैसे दिले होते. असे असताना दोघांनी अविनाश यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. पैसे देऊनही दोघे फोन करून अविनाश पवार याला मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून अविनाश यांनी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. मयता कडे सापडलेल्या चिठ्ठी मध्ये दोघांच्या नावाचा उल्लेख असल्याने अजय पवार याने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली.पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

COMMENTS