पुणे/बीडः बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील तीन आरोपी गेल्या काही
पुणे/बीडः बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील तीन आरोपी गेल्या काही दिवसांपासून फरार होते, अखेर या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या. तर यातील तिसरा आरोपी अजूनही फरार आहे. सुदर्शन घुल आणि सुधीर सांगळे या दोघांना बेड्या ठोकल्या असून, तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याचे समोर आले आहे.
नांदेड येथून अटक केलेल्या डॉक्टर संभाजी वायबसे यांनी दिलेल्या टिपच्या आधारावर या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आला. सुदर्शन घुले हा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला जात आहे. आता त्याच्याविषयी वेगवेगळी माहिती पुढे येत आहे. विशेषतः सुदर्शन घुले हा या हत्याकांडाचा खरा मास्टरमाइंड असणार्या वाल्मीक कराडहून डेंजर असल्याचा दावा केला जात आहे. संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली. तेव्हापासून सुदर्शन घुले आपल्या सहकार्यांसह फरार झाला होता. आता तो पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यामुळे देशमुख हत्याकांडाचे विविध पदर उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः सुदर्शन घुले हा मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड याच्या आदेशांनुसार काम करत असल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलिस खंडणी प्रकरणात अटक झालेल्या वाल्मीक कराडचा देशमुख हत्याकांडाशी काही संबंध आहे का? याची चाचपणी करत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना 9 डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात सुदर्शन चंद्रभान घुले, कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे, महेश सखाराम केदार, जयराम माणिक चाटे, प्रतिक भीमराव घुले, विष्णू महादेव चाटे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एसआयटीची स्थापना केल्यानंतर तपासाला वेग आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांना अटक केली आहे. हे दोघे व संतोष देशमुख यांचे लोकेशन देणार्या आणखी एकाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपींना 14 दिवसांची पोलिस कोठडी
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना शनिवारी केज न्यायालयात हजर करण्यात आले होते. या आरोपींनी केज न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना आज पहाटे पुण्यातून अटक केली. सीआयडी आणि एसआयटीच्या पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. सीआयडीने आरोपींना केज न्यायालयात हजर केले. यावेळी सुनावणी दरम्यान सीआयडीने 15 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी दिली आहे. दरम्यान, एक आरोपी अद्यापही फरार आहे.
COMMENTS