Homeताज्या बातम्यादेश

पृथ्वी-2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

चांदीपूर : पृथ्वी-2 या अणवस्त्रवाहक क्षेपणास्त्राची मंगळवारी रात्री 10 जानेवारी रोजी यशस्वी चाचणी करण्यात आली. ओडिशातील चांदिपूर तळावरील मोबाइल ल

आमदार डॉ. लाहमटे यांच्या जनता दरबारातून अनेकांचे प्रश्‍न मार्गी
चंद्रकांतदादा या प्रकरणात पडू नका,नाही तर तुमचेही कपडे फाटतील | LOKNews24
‘कोरोना’मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे : कृषीमंत्री दादाजी भुसे

चांदीपूर : पृथ्वी-2 या अणवस्त्रवाहक क्षेपणास्त्राची मंगळवारी रात्री 10 जानेवारी रोजी यशस्वी चाचणी करण्यात आली. ओडिशातील चांदिपूर तळावरील मोबाइल लाँचरवरुन या क्षेपणास्त्राने उड्डाण केले आणि अचूक लक्ष्यभेद केला. पृथ्वी -2 ची मारक क्षमता 350 किलोमीटर आहे.

ओडीशामधील चांदीपूर येथील भारताच्या स्ट्रॅटीजिक फोर्स कमांडने इंटिग्रेटेड स्टेट रेंजवरुन पृथ्वी-2चे यशस्वी परिक्षण केले आहे. पृथ्वी-2 ची मारक क्षमता आणि अचुकता लक्षात येण्यासाठी ही टेस्टींग रात्री केल्याची अधिकृत माहीती दिली आहे. नवीन भरती झालेल्या अधिकार्‍यांना मिसाईल लॉचिंगचे ट्रेनिंग देण्यासाठी हे लाँचिग करण्यात आले. हे सिंगल स्टेज लिक्विड इंधन मिसाईल आहे. पृथ्वी मिसाईलवर 500 ते 1000 किलोग्रॅमची परमाणु हत्यारे लावण्याची व्यवस्था केली आहे. महत्वाचे म्हणजे, शत्रूच्या ऍटी-बॅलेस्टिक मिसाईलच्या तंत्रज्ञानाला धोका देण्यात सक्षम आहे.

COMMENTS