Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वारकर्‍यांना मिळणार विमा संरक्षण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई/प्रतिनिधी ः आषाढी एकादशीनिमित्त प्रत्येक वारकरी आपल्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी दिंडीच्या माध्यमातून चालत-चालत पंढरपूर गाठतो. ना ऊन-वारा

पुणेकरांनी अडवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा
शिंदे गटाच्या दसरा मेळावा खर्चाची होणार चौकशी
अतिवृष्टीग्रस्तांच्या भरपाई रकमेत दुपटीने वाढ

मुंबई/प्रतिनिधी ः आषाढी एकादशीनिमित्त प्रत्येक वारकरी आपल्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी दिंडीच्या माध्यमातून चालत-चालत पंढरपूर गाठतो. ना ऊन-वारा, पाऊस कशाचीही चिंता न करता, तो पंढरपूर गाठतो. या प्रवासात त्याला कसलेही संरक्षण मिळत नाही, मात्र आता वारकर्‍यांना विमा संरक्षण मिळणार असून, तशी घोषणाच बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
पंढरपूरच्या आषाढी वारीतील वारकर्‍यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षणाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे लाखो वारकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकर्‍यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लाखो वारकर्‍यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या 30 दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. यामध्ये एखाद्या वारकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास 1 लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल. वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी हा या योजनेमागचा उद्देश आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करताना सांगितले.

COMMENTS