Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाटोदा ममदापूर महसूल मंडळातील उपोषणकर्त्या शेतकर्‍यांच्या मागणीला यश

राजेसाहेब देशमुख, राजेश्वर चव्हाण यांच्या मध्यस्थीने तहसीलदार यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

अंबाजोगाई प्रतिनिधी - अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा ममदापुर महसूल मंडळातील शेतकरी खरीप हंगाम 2022 सोयाबीन अनुदानापासून वंचित होते. सोयाबीन अनुदान

प्रा. डॉ. रत्नमाला प्रकाश सोनवणे युरोपला रवाना
नोकरीच्या आमीषाने 8 तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक
शेतकऱ्यांना वेळेत पिक कर्ज द्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा ममदापुर महसूल मंडळातील शेतकरी खरीप हंगाम 2022 सोयाबीन अनुदानापासून वंचित होते. सोयाबीन अनुदान मागणीसाठी तहसील कार्यालय आंबेजोगाई येथे नऊ जून शुक्रवारपासून पाटोदा ममदापुर महसूल मंडळातील केशव नाना ढगे आणि रवींद्र ढगे आमरण उपोषण करत होते .या उपोषणकर्त्याच्या शेतकर्‍यांच्या मागणीला यश  मिळाले असून पाटोदा ममदापुर महसूल मंडळाला आठ कोटी 49 लाख 4800 रुपये मागणी  महसूल प्रशासनाने केली असून लवकरच पाटोदा ममदापूर महसूल  मंडळातील शेतकर्‍यांना अनुदान मिळेल. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण यांच्या मध्यस्थीने तहसीलदार विलास तरंगे पाटील यांच्या आश्वासनानंतर उपोषणकर्ते केशव नाना ढगे आणि रवींद्र ढगे या  शेतकर्‍यांनी उपोषण मागे घेतले.
पाटोदा ममदापूर महसूल मंडळातील शेतकरी खरीप हंगाम 2022 सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन देखील अनुदानापासून वंचित होते वेळोवेळी मागणी करून देखील ही महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केले होते शेतकर्‍यांना खरीप 2023 ची पेरणी करण्याची वेळ आली तरी पाटोदा ममदापूर महसूल मंडळातील शेतकर्‍यांना अनुदान पासून वंचित ठेवले होते सतत मागणी करून देखील शेतकर्‍यांना न्याय मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी अंबाजोगाई येथील तहसील कार्यालय येथे शुक्रवारपासून समोरून उपोषण सुरू केले होते शेतकर्‍यांनी चार दिवस उपोषण केले उपोषणकर्त्याची प्रकृती खालवली होती माजी आमदार पृथ्वीराज साठे माजी आमदार संजय भाऊ दौंड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण यांनी बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याशी चर्चा केली  .पाटोदा ममदापूर महसूल मंडळासाठी 8 कोटी 49 लाख  4800 रुपये मागणी शासनाकडे केली आहे पाटोदा ममदापुर मंडळासह बीड जिल्ह्यातील राहिलेल्या मंडळातील शेतकर्‍यांसाठी 80 कोटी ची मागणी महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण यांनी उपोषण स्थळी बोलताना दिले. उपोषण सोडते वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण बाजार समितीचे माजी सभापती अमर देशमुख तहसीलदार विलास तरंगे पाटील  यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आले पाटोदा ममदापुर महसूल मंडळातील शेतकर्‍यांच्या सोयाबीन अनुदान मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकर्‍यांना महाविकास आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता. पाटोदा महसूल मंडळातील शेतकर्‍यांच्या उपोषणामुळे बीड जिल्ह्यातील अनेक मंडळातील शेतकर्‍यांना लाभ मिळणार आहे

COMMENTS