Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्वपूर्ण साधन ः भावना खैरनार

कोपरगाव तालुका ः सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकवण्यासाठी प्राथमिक शिक्षण महत्त्वाचे आहे. नगरपालिका शाळेत गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले

आषाढी यात्रा : पंढरपूरसह १० गावांत सात दिवस संचारबंदी
खासगी सावकारीतून तरूणावर शस्त्राने वार
शाम्पूपासून कॅन्सरचा धोका; जॉन्सननंतर युनिलिव्हर कंपनी अडचणीत

कोपरगाव तालुका ः सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकवण्यासाठी प्राथमिक शिक्षण महत्त्वाचे आहे. नगरपालिका शाळेत गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जाते. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे. गावाचा विकास शाळेपासूनच होतो. शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. असे मत भावना खैरनार यांनी व्यक्त केले. नगरपालिका शाळा क्रमांक सहा येथे शाळा पूर्वतयारी मेळावा नुकताच पार पडला.
    निपून भारत अंतर्गत इयत्ता पहिलीत नव्याने दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात दोन मेळावे आयोजित केले जातात. त्यापैकी पहिला मेळावा नुकताच नगरपालिका शाळा क्र.6 येथे संपन्न झाला. याप्रसंगी एम के आढाव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भावना खैरनार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रत्नाकर गायकवाड, नगरपालिका शिक्षण मंडळाच्या लिपिक कल्पना बच्छाव, आंगणवाडी सेविका मंगल सताळे ,सुवर्णा ओढणे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे -पालकांचे ढोलच्या गजरात स्वागत करण्यात आले.नंतर सर्व मुलांना फूल,फूगे देऊन त्यांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले.शाळेतील शिक्षकांनी नोंदणी कक्ष,भाषाविकास,गणनपूर्वतयारी,सामाजिक व भावनिक विकास, बौद्धीक विकास,शारीरिक विकास,माता पालकांना साहित्य वाटप या विषयांवर आधारीत शालेय साहित्य स्टाल लावण्यात आले होते. प्रत्येक स्टालवर दाखल पात्र विद्यार्थ्यांचे विविध प्रात्यक्षिकांमधून सादरीकरण घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी ही उत्स्फूर्तपणे प्रत्येक स्टॉलला भेट दिली. फुगे, चॉकलेट, सेल्फी पॉईंट गोष्टी पाहून सर्व विद्यार्थी भारावून गेले. उपक्रमशील शिक्षिका सुनिता इंगळे यांनी आकर्षक फुग्यांची सजावट केली होती. पालकांनाही पहिलीच्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत कोणकोणते अभ्यासपूर्वक कार्यक्रम घ्यायचे याबद्दल माहिती देण्यात आली. कृतीपत्रिकेचे वाटप करण्यात आले. अशा प्रकारचा पालक विद्यार्थी मेळावा जून महिन्यात पुन्हा एकदा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी  नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी श्रीराम थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.शाळेच्या मुख्याध्यापिका सविता साळुंके, कल्पना निंबाळकर, आरती कोरडकर,अरुण पगारे, सुनीता इंगळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अर्चना वाहुळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले

COMMENTS