Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर

महाड : राज्यासह देशाचे राजकारण ढवळून काढणाऱ्या घटनाक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज, मंगळवारी रात्री महाडच्या न्यायालयाने सशर्त जामीन

राज्यपालांच्या संवैधानिक जबाबदारीचे काय ?
औरंगाबादेत 15 वर्षाच्या मुलाचा 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार |LokNews24
महिला पोलिस उपनिरीक्षकांनी हनुमान रथाला लावला मानाचा ध्वज

महाड : राज्यासह देशाचे राजकारण ढवळून काढणाऱ्या घटनाक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज, मंगळवारी रात्री महाडच्या न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी रात्री महाड महाड न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांनी राणे यांची 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने दोन्ही बाजूंने युक्तीवाद ऐकून राणेंना जामीन मंजूर केला. नारायण राणे यांना गोळवलीमध्ये अटक केल्यानंतर महाड इथे आणण्यात आले. त्यानंतर महाड न्यायदंडाधिकारी बाबासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी पार पडली. महाड न्यायालयात सुनावणी सुरू असताना नारायण राणे यांच्या पत्नी नीलम यांच्यासह संपूर्ण राणे कुटुंब तिथे दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी राणे यांची 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. परंतु, नारायण राणे यांचे वकील आदिक शिरोडकर यांनी युक्तिवाद केला. नारायण राणे यांचे वय आणि प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

राणेंना कोणती औषधे सुरू आहेत याबाबत वकिलांनी न्यायालयात माहिती दिली. यासोबत प्रकृती पाहता जामीन द्यावा अशी विनंती केली आहे. राणेंना मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास आहे, यावर त्यांची औषध सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली. यासोबतच केंद्रीय मंत्री असलेल्या राणे यांना अटक करण्यापूर्वी कोणतीही नोटीस देण्यात आली नसल्याचे राणेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितले. 

COMMENTS