Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तालुका, कार्यालयाचे नव्या जागेत स्थलांतर

नाशिक -   विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग यांच्या अनुमतीनुसार उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक  तालुका यांचे कार्यालय सहकार संकुल नॅशनल उर्

भाजपकडून लोकशाही व संविधान संपवण्याचा प्रयत्न ः थोरात
सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन
कालिचरण महाराजांना उमेदवारी दिली तर…

नाशिक –   विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग यांच्या अनुमतीनुसार उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक  तालुका यांचे कार्यालय सहकार संकुल नॅशनल उर्दू हायस्कूलजवळ, सारडा सर्कल, नाशिक या ठिकाणाहून  संकुल क्रमांक 4, पहिला मजला, शरदचंद्र पवार मार्केट यार्ड, पेठ रोड, पंचवटी नाशिक 422003 येथे 1 जून 2024 पासून स्थलांतर करण्यात येणार आहे. अशी माहिती  उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तालुका संदिप जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

वरील कार्यालयाशी संबधित कार्यालयीन कामकाजाकरीता सर्व नागरिकांनी नवीन पत्त्यावरील कार्यालया संपर्क साधावा, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.

COMMENTS