‘आप’ चा निर्णय ओबीसींच्या दृष्टीने!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘आप’ चा निर्णय ओबीसींच्या दृष्टीने!

आज आप या राजकीय पक्षात हरिभाऊ राठोड यांचा प्रवेश झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन करित असताना काही प्रश्न उपस्थित होत आहेत. वास्तव प्रश्न मांडण्यातून त्यां

मोदींची धक्कादायक मुलाखत !
….तर, मराठा आरक्षण आंदोलनाचे नैतिक बळच हरवेल!
सत्ताकारणाचा केंद्रबिंदू माणूसच असावा ! 

आज आप या राजकीय पक्षात हरिभाऊ राठोड यांचा प्रवेश झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन करित असताना काही प्रश्न उपस्थित होत आहेत. वास्तव प्रश्न मांडण्यातून त्यांच्याशी काही मतभेद व्यक्त करित आहोत, असे नाही. परंतु, सामाजिक पातळीवर ओबीसींच्या दृष्टीने या घटनेचा अन्वयार्थ काय, हे समजून घेणे गरजेचे आहे. ओबीसी आरक्षणाचा लढा देणारे हरिभाऊ राठोड यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग हा राजकीय आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या एखाद्या दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश होईल, अशी चर्चा होती. आज त्या चर्चेला सत्य ठरवित, आप या राजकीय पक्षात त्यांनी प्रवेश केला. तसं पाहिलं तर त्यांचे राजकारण सत्तेत समावेशा झाला होता. भाजपपासून सत्तेची सुरूवात झालेले हरिभाऊ यांना सत्तेचा मोह नंतर कायम राहिला. त्यामुळे, त्यांनी नंतर काॅंग्रेसची सोबत केली. तिथेही ते सत्तेत विराजमान राहिले. अर्थात, सत्तेत राहणे म्हणजे मंत्री किंवा मुख्यमंत्री बनणे नव्हे; तर लोकप्रतिनिधी असणं हा देखील सत्तेचा भाग आहे. त्यांच्या सत्तेचा प्रवास हा बहुधा वरच्या सभागृहातून राहीला आहे. वरच्या सभागृहात त्यांनाच पाठवले जाते, त्यांच्यामागे सामाजिक आधार आहे. परंतु, वस्तुस्थिती जर पाहिली तर त्यांना सामाजिक पाठबळ नाही. मात्र, यासाठी त्यांनी एक सूत्रबद्ध रचना वापरली. ओबीसी आपल्या पाठीशी आहेत, हे दाखवण्यासाठी त्यांनी ओबीसी आरक्षणाचा लढा दिला. हा लढा त्यांनी याचिकांपुरताच मर्यादित ठेवला. त्यासाठी, त्यांना कोणत्याही पक्षात राहिलें तरी, प्रशासकीय पातळीवर त्यांना बऱ्यापैकी मदत होत राहीली. असो अर्थात, त्यांच्या एकूण या भूमिकेविषयी आपल्याला बोलायचे नाही; तर, ज्या समग्र ओबीसी समाजाचे आपण नेते आहोत किंवा ओबीसी समाज आपल्या नेतृत्वात असल्याचा जो भास ते निर्माण करताहेत, त्यातूनच त्यांची पक्षांतरे वाढत चालली आहेत. आज त्यांनी आपल्या राजकीय करिअरमध्ये आणखी एका पक्षाचा समावेश करून घेतला. आप हा पक्ष महाराष्ट्रात आपली पाळेमुळे शोधण्याचा किंवा ती विस्तारण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यात त्यांना आता राजकीय प्रस्थापित ओबीसी व्यक्ती नावाला हवा आहे. यासाठी ज्यांचे ओबीसी समाजात अस्तित्व नाही अशा व्यक्तिमत्त्वांचा शोध राजकीय पक्षांना नेहमीच राहतो त्यास आप हा पक्ष अपवाद ठरलेला नाही. समस्त ओबीसी समाज तो महाराष्ट्रात बहुसंख्यांक आहे त्याचा आरक्षणाचा लाभार्थी सामाजिक पातळीवर आणि प्रसार माध्यमातून कार्यरत असणाऱ्या ओबीसी नेत्यांनी मोठ्या प्रमाणात केला असला तरी त्याची श्रेय राजकीय स्टंटबाजी करणारे लोक नेहमी करतात त्यातील एक व्यक्तिमत्व हरिभाऊ राठोड यांचं आपल्याला म्हणता येईल त्यामुळे अशा व्यक्तिमत्त्वांना राजकीय पक्षात मोठ्या पदावर घेऊन समस्त ओबीसी समाजाचा एक प्रकारे अवमान केला जातो आहे; कारण हरिभाऊ राठोड हे केंद्रीय पातळीवर ओबीसी असले तरी ते राज्याच्या पातळीवर ओबीसी ठरत नाही; त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसींचे राजकीय नेतृत्व तयार करताना ओबीसी समाजाला विश्वासार्हपणे विचारात घ्यायला हवे. केवळ भारतीय जनता पक्षाशी सत्ता स्पर्धा करण्यासाठी नामधारी लोकांना सोबत घेऊन पक्षाची व्यापकता होऊ शकत नाही. अर्थात, आप या पक्षाने त्यांच्या पक्ष वाढीसाठी काय करावे, हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु, राजकीय पक्षात कोणतीही बाब खाजगी राहत नाही; राजकीय पक्षाने घेतलेले कोणतेही निर्णय हे सार्वजनिक समाजकारणाचा भाग बनतातच! आप चा राजकीय प्रवास केवळ भारतीय जनता पक्षाला समांतर राजकारण करण्याच्यादृष्टीने सुरू आहे. त्या पक्षाला ज्यावेळी दिल्लीत अडचणींना सामोरे जावे लागत आहे, तेव्हा महाराष्ट्रात ते राजकीय विस्ताराच सूत्र जे अवलंबित आहेत, त्याचे मुख्य कारण चर्चेत राहण्याची वेळ त्यांनी निवडली आहे. 

COMMENTS