Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खंडाळ्याच्या ब्रिलियंट इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थी दिन साजरा

लोणंद / प्रतिनिधी : आदर्श शिक्षण संस्थेच्या ब्रिलियंट इंग्लिश मिडीयम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज खंडाळा-बावडा येथे विद्यार्थी दिवस साजरा करण्या

माण तालुक्यातील वीर जवान दादासो तोरसकर यांना अखेरचा निरोप
शिष्यवृत्ती परीक्षेत सातारच्या ’पोदार इंटरनॅशनल स्कूलचा निरंजन तोरडमल महाराष्ट्रात प्रथम
सरकार पडतंय की राहत हा गौण विषय : पंकजा मुंडे

लोणंद / प्रतिनिधी : आदर्श शिक्षण संस्थेच्या ब्रिलियंट इंग्लिश मिडीयम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज खंडाळा-बावडा येथे विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. 7 नोव्हेंबर हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन असतो. या दिनाचे औचित्य साधूनच राज्यात विद्यार्थी दिवस साजरा केला जात असतो. या दिनाचे औचित्य साधुन नितीन शामराव शिंदे यांचा पुत्र स्वराज नितीन शिंदे या बालकाचा शाळा प्रवेश ब्रिलीयंट इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मिनी के. जी. या वर्गात करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण दिवस असलेल्या या दिवशीच हा प्रवेश या बालकाने घेतल्याने शालेय प्रशासनाकडून त्याचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गौतम भोसले, उपाध्यक्ष जयकुमार खरात, सचिव सौ. स्नेहल खरात, प्राचार्या कु. सुदर्शना जाधव, उपप्राचार्या सौ. स्वाती ढसाळ, सौ. संध्या मोरे आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. आदर्श शिक्षण संस्थेच्या ब्रिलियंट इंग्लिश मिडीयम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजसाठी तिनही शाखांची (आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स) शासनाची मान्यता मिळाल्याबाबत पालक आणि विद्यार्थी तसेच शिक्षक आणि सर्व विश्‍वस्त यांनी आनंद व्यक्त केला आणि संस्थेच्या आणि शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ब्रिलियंट इंग्लिश मिडीयम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध स्पर्धांचे नेहमी आयोजन करण्यात येते. तसेच मुलींसाठी त्यांच्या आत्मसन्मान आणि आत्मविश्‍वास व आत्मसंरक्षणासाठी कराटे क्लासेस सुरू करण्यात आले आहेत.

COMMENTS