Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समाजकार्य महाविद्यालयात विद्यार्थी संवाद

अंबाजोगाई प्रतिनिधी - समाजकार्य महाविद्यालयात गेल्या पाच वर्षापासून परीवर्तन संवाद कट्टा हे विद्यार्थ्यांचे व्यासपीठ चालविले जाते. या व्यासपीठाअं

फडणवीस यांना हप्तेखोरीचा मोठा अनुभव : पटोले
आंबेजोगाईत सहा जणांचा मृत्यू ; नातेवाइकांचा आरोप; रुग्णालय प्रशासन असहमत
बॉलिवूडमधील काहींना कोरेनासंबंधीची कामे ; नीलेश राणे यांचा आरोप ; ठाकरेंवर उखळ पांढरे करून घेतल्याची टीका

अंबाजोगाई प्रतिनिधी – समाजकार्य महाविद्यालयात गेल्या पाच वर्षापासून परीवर्तन संवाद कट्टा हे विद्यार्थ्यांचे व्यासपीठ चालविले जाते. या व्यासपीठाअंतर्गत समाजामध्ये विविध प्रकारे ओळख निर्माण करणार्‍या व विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या व्यक्तींना विद्यार्थ्यांशी संवाद करण्यासाठी निमंत्रित केले जाते दि. 31 ऑगष्ट रोजी परीवर्तन संवाद कट्टयावर अर्पिता यांना निमंत्रित केले होते. अर्पिता या तृतीय पंथी (ट्रान्सजेंडर) समुदायाचे प्रतिनिधीत्व करतात.  तृतीय पंथी व्यक्तींना समाजामध्ये मिळणारी विषमतापूर्ण वागणूक आणि त्याच्यासमोर असणारे आव्हाने या विषयाच्या अनुषंगाने अर्पिता यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथीयांनासुध्दा भारताचा सन्माननीय नागरिक अशी ओळख प्रस्थापित केली त्यामुळे विविध क्षेत्रात संधी उपलब्ध झाली आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. समाजाच्या लिंग आधारित उतरंडीवर सर्वात शेवटचा थर म्हणून ङॠइढट + या समुदायाकडे अत्यंत उपेक्षेने पाहिले जाते. माणूस म्हणून जगण्याचीही संधी कित्येकवेळा नाकारली जाते अशा वेळी गुरू शिष्य परंपरेतून या सर्वांना रोजगार आणि संरक्षण याची हमी मिळते. परंतु समाजाच्या लिंगभेद आधारित चौकटीच्या बाहेर पडण्यासाठी तरूण तरूणी यांनी तृतीयपंथीय लोकांच्या भावना समजून घ्यायला पाहिजे असे मत अर्पिया यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अर्पिता यांच्याशी विविध प्रश्नावर चर्चा केली. कार्यक्रमाचे आयोजन, सुत्रसंचलन आभार इ. सर्व विद्यार्थ्यांच्याच पुढाकाराने पूर्ण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेन्द्र उजगरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार वंदना कांबळे हिने मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. अरूंधती पाटील समन्वयक, परीवर्तन संवाद कट्टा विद्यार्थी प्रतिनिधी रोशन गायकवाड व सर्व प्राध्यापकांनी श्रम घेतले.

COMMENTS