Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत युवक काँगे्रसचे जोरदार आंदोलन

विधानभवनाला घेराव घालण्याचा प्रयत्न

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्य युवक काँगे्रसने मंगळवारी महागाई, बेरोजगारी, राज्याबाहेर गेलेले प्रकल्प आदी मागण्यांसाठी विधानसभेला घालण्याचा प

महाराष्ट्रात कोरोना लसीचा तुटवडा : राजेश टोपे
जिल्हा परिषदेत एकदिवसीय पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण कार्यशाळा 
मंत्री अनिल परब यांची चौकशी सुरू

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्य युवक काँगे्रसने मंगळवारी महागाई, बेरोजगारी, राज्याबाहेर गेलेले प्रकल्प आदी मागण्यांसाठी विधानसभेला घालण्याचा प्रयत्न करत, मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून महाराष्ट्र युवक काँग्रेसने मोर्चाला सुरुवात केली होती. मात्र, पोलिसांनी या ठिकाणीच हा मोर्चा अडवला आहे. त्यामुळे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणखी आक्रमक झाल्याचे दिसून आले.  पोलिसांनी अडवल्यानंतर कार्यकर्त्यांनी सीएसएमटी परिसरातच ठिय्या आंदोलन सुरू केले असून राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. पोलिसांनी बॅरीकेडद्वारे आंदोलकांना रोखून धरले आहे. काही आंदोलकांनी बॅरीकेड ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अशा आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकर्‍याच्या शेतीमालाला हमीभाव, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे झालेले अतोनात नुकसान, त्याचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकर्‍यांना भरीव मदत झाली पाहिजे, आदी मागण्यांसाठी विधानसभेला घेराव आंदोलन पुकारण्यात आले होते.

COMMENTS