Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विजेचा शॉक लागून बाप-लेकासह चौघांचा मृत्यू

पुणे/प्रतिनिधी ः पुणे जिल्ह्यात विजेचा शॉक लागल्यामुळे बाप लेकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील भो

आरोग्य सेवा न मिळाल्याने विवाहितेचा मृत्यू; डॉक्टरांच्या निषकाळजीपणाचा दोन महिन्यांत दुसरा बळी
दिवाळीत एसटी महामंडळ मालामाल
चक्रीवादळाची आपबीती ..11 तासांचा ‘तो’ संघर्ष | सुपरफास्ट २४ | LokNews24 |

पुणे/प्रतिनिधी ः पुणे जिल्ह्यात विजेचा शॉक लागल्यामुळे बाप लेकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील भोर मधील निगडी या गावामध्ये ही घटना घडली आहे. नदीच्या पाण्यात मोटार सोडत असताना शॉक लागून या चौघांचा मृत्यू जागीच मृत्यू झाला आहे.


पुणे-सातारा महामार्गावरील निगडे ता.भोर येथे नदीपात्रात मोटार टाकत असताना विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून मयत चौघेही निगडे गावातील आहेत. विठ्ठल सुदाम मालुसरे (वय.45), सनी विठ्ठल मालुसरे (वय 26), अमोल चंद्रकांत मालुसरे (वय 36) आणि आनंदा ज्ञानेश्‍वर जाधव (वय 55, सर्वजण रा निगडे) या चौघांचा मृत्यु झाला आहे. राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निगडे गावच्या हद्दीत गुंजवणी नदीच्या पाण्यात बंधार्‍याच्या बँकवॉटरमध्ये विठ्ठल मालुसरे यांची पाण्याची मोटार टाकण्याचे काम सुरु होते. त्यासाठी चौघेजण मोटार घेवून पाण्यात ढकलत होते. त्यावेळी विजेचा शॉक बसला. पाण्यात वीजेचा प्रवाह आल्यामुळे चौघांचाही जागीच मृत्यु झाला आहे.

COMMENTS