Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार

घरात घुसून एकाची हत्या

पुणे प्रतिनिधी - मध्यरात्री घडलेल्या खुनाच्या घटनेनं पुन्हा एकदा पुणं हादरलं आहे. रविवारी मध्यरात्री खुनाच्या घटनेनं पुणे शहर हादरलं. खडक पोल

पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
डॉ. अ‍ॅड. राजेंद्र सारडा यांच्या पाठीवर बीडच्या संगीत रसिकाकडून कौतूकाची थाप
राज्यात कोरोनाची चौथी लाट ?

पुणे प्रतिनिधी – मध्यरात्री घडलेल्या खुनाच्या घटनेनं पुन्हा एकदा पुणं हादरलं आहे. रविवारी मध्यरात्री खुनाच्या घटनेनं पुणे शहर हादरलं. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळ्या झाडून एकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. मध्यरात्री अंदाजे 2 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अनिल साहू (वय 35) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मध्यरात्री झालेल्या खुनाच्या घटनेनं पुणं पुरतं हादरलं असून परिसरात भितीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत अनिल साहू घोरपडे पेठेतील सिंहगड गॅरेज चौकात राहत होता. मध्यरात्रीच्या सुमारास अनिल साहू गाढ झोपेत होता, तेवढ्यात एक अज्ञात व्यक्ती तिथे आली आणि घरात शिरुन त्या व्यक्तीनं अनिल साहूवर एकापाठोपाठ एक तीन गोळ्या झाडल्या. अज्ञात व्यक्तीनं गोळ्या झाडल्या त्यावेळी अनिल साहूचे कुटुंबियही घरातच होते. अज्ञात इसमानं गोळ्या झाडल्या आणि तिथून तात्काळ काढता पाय घेतला. हल्लेखोर पसार झाल्यानंतर अनिल साहू यांना रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी अनिल साहू यांनी तपासलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दुर्दैवानं अज्ञात हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्यांमुळे अनिल साहुचा आधीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होत, तपास सुरू केला. याप्रकरणी आता पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पोलिसांकडून तपासची सूत्र वेगानं हलवली जात असून फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

COMMENTS