Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री क्षेत्र निंबे येथे हरिनाम सप्ताहास प्रारंभ

कर्जत : आकर्षक फुले, विद्युत रोषणाई, रांगोळ्यांची सजावट अशा मंगलमय वातावरणात निंबे येथील ग्रामदैवत संत लिंबाजी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहा

वाईन निर्णयाविरोधात नगरने दाखल केली जनहित याचिका
अक्षय पवार ठरला मल्हार केसरीचा मानकरी
साई समाधीवर सर्वसामान्य साई भक्तांना वस्त्रचढवता येणार- राहुल जाधव

कर्जत : आकर्षक फुले, विद्युत रोषणाई, रांगोळ्यांची सजावट अशा मंगलमय वातावरणात निंबे येथील ग्रामदैवत संत लिंबाजी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे. संत लिंबाजी महाराजांच्या दर्शनासाठी विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने असतात.
कीर्तन सेवेसाठी भव्य असा मंडप उभारला असून महाराष्ट्रातील नामवंत महाराजांची कीर्तनसेवा होणार आहे. सकाळपासूनच विविध भागातून भाविकांची निंबेकडे रेलचेल सुरु होती. गावातील संत हनुमान मंदिरापासून महाराजांची फुलांनी सजवलेली पालखी ग्रामप्रदक्षिणा करून संत लिंबाजी महाराज मंदिरात दाखल झाली. यावेळी संत श्री लिंबाजी महाराजांच्या गजराने निंबे गाव दुमदुमले होते. आबालवृद्ध व तरुणांनी पालखीच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. त्यानंतर कलश, विनापूजन व पंचपदी भजनाने सप्ताहास सुरुवात झाली. मंदीर परिसराचे सुशोभीकरण झाल्याने भाविकांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती. मंदिरावरील शिखरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून वाढत्या उन्हामुळे दर्शन रांगेसह मंदीर परिसरात विविध ठिकाणी पाण्याची सोय करण्यात आली आहे.

COMMENTS