Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड शहरातील गुगळे प्रवासी शेड सुरू करा

नवीन बस स्थानकांचे काम सुरू असल्यामुळे प्रवाशांची हेळसांड

जामखेड प्रतिनिधी : जामखेड शहरातील नवीन बस स्थानकाचे काम चालू असल्याने जुने बस सेड पाडले आहे. बसला उभा राहण्यास जागा नाही तसेच प्रवाशांनाही उन्हा

पारनेर टँकर घोटाळ्याचा तपास ईडीकडे सोपवा  
शिर्डी लोकसभा निवडणुकीत मातंग समाज निर्णायक भूमिका घेणार ः जगधने
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याने केली आत्महत्या

जामखेड प्रतिनिधी : जामखेड शहरातील नवीन बस स्थानकाचे काम चालू असल्याने जुने बस सेड पाडले आहे. बसला उभा राहण्यास जागा नाही तसेच प्रवाशांनाही उन्हातच उभा रहावे लागत आहे. त्यामुळे बस डेपो समोरील एच यु गुगळे प्रवाशी सेड चालू करुन तेथे ग्रामीण भागातील बस थांबा पुन्हा चालू करण्याची गरज आहे.
सध्या या प्रवाशी शेडमध्ये प्रवाशी बाहेर उन्हात तर आतमध्ये खाजगी वाहनांची पार्किंग व रिकामटेकडयांचे विश्रांती ठिकाण झाल्याचे दिसत आहे. सध्या नवीन बसस्थानकाचे काम चालू आहे. तेथे बस स्थानक पाडले असल्याने एसटी उभा राहण्यास जागा कमी पडत आहे. अशावेळी ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी, वृद्ध प्रवाशांना महीलांना उन्हात, ताटकळत थांबावे लागते. या त्रासाकडे कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकांचे मात्र लक्ष नाही. यापूर्वी खर्डा चौकात गर्दी होत असल्याने तेथील बस थांबा बंद करून आगाराजवळ बस थांबा करण्यात आला. प्रवाशांना उन पाऊस सहन करत उघड्यावरच उभा राहावे लागत असल्याने त्यावेळी महामंडळाच्या आधिकारयांच्या मागणीनुसार प्रवाशांची गरज ओळखून सामाजिक जवाबदारी म्हणून एच.यु.गुगळे उद्योगसमूहचे रमेश गुगळे यांनी हे प्रवासी शेड स्वखर्चाने बांधून दिलेले आहे. तरी संबंधित आधिकारयांनी त्या बस शेडचा प्रवाशांसाठी लवकरात लवकर वापर चालू करून तेथे ग्रामीण भागातील बसचा थांबा पुर्ववत चालू करावा अशी मागणी प्रवाशांमधुन होत आहे.

पोलिसांनी सहकार्य करावे :  सागर शिंदे – नवीन बस स्थानकाचे काम चालू आहे. डेपोसमोरील एच यु गुगळे प्रवाशी सेड चालू आहे मात्र त्याच्या समोर खाजगी वाहन लावून लोक निघुन जातात. काही दूकानंही समोरच लावली आहेत आम्ही अनेकवेळा सांगितले मात्र लोक ऐकत नाहीत. यांच्यामुळे बसला प्रवाशी सेडसमोर उभा राहण्यास जागाच राहत नाही. या दूकानांचा व सेडसमोरच रोडवर थांबणारया खाजगी वाहनांचा बंदोबस्त करण्यासाठी डेपोच्या वतीने पोलीस स्टेशन व नगरपरिषदला सहकार्य करण्याबाबत पत्र दिले आहे. पोलीस प्रशासनाने सहकार्य लवकर करावे म्हणजे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामीण भागातील बसचा थांबा या एच यु गुगळे प्रवाशी शेडमध्ये लवकरच चालू करता येईल असे सहाय्यक डेपो मँनेजर सागर शिंदे यांनी सांगितले.

COMMENTS