Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पगार न झाल्याने एसटी कर्मचार्‍याची आत्महत्या

सांगली/प्रतिनिधी ः जानेवारी महिना संपून तब्बल 16 दिवस उलटले असले तरी अनेक जिल्ह्यात एसटी कर्मचार्‍यांचे पगार झालेले नाही. सांगली जिल्ह्यातील कवठे

… तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आरक्षण रोखू ; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला इशारा
विधानसभेत ‘शक्ती कायदा’ मंजूर ; 30 दिवसांत करावा लागणार तपास पूर्ण
कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढ

सांगली/प्रतिनिधी ः जानेवारी महिना संपून तब्बल 16 दिवस उलटले असले तरी अनेक जिल्ह्यात एसटी कर्मचार्‍यांचे पगार झालेले नाही. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पगार न झाल्याने चालकाने हे पाऊल उचलले असल्याची चर्चा सुरू असली तरी अद्याप आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. घटनेचर माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. भीमराव सूर्यवंशी असे मृत एसटी कर्मचार्‍याचे नाव आहे.

COMMENTS