देशभरात तापमान घटले, दिल्लीत प्रदूषणात मोठी वाढ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशभरात तापमान घटले, दिल्लीत प्रदूषणात मोठी वाढ

नवी दिल्ली : दिवाळी सरता सरता देशभरात थंडीची चाहूल लागली आहे. दरम्यान कोरोनानंतर निर्बंधमुक्त सणामुळे यंदा फटाके फोडण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी

कॉंग्रेसचे बाळासाहेब भुजबळ, सविता मोरे व ओंकार लेंडकर यांचा भाजपात जाहीर प्रवेश
चंद्रमुखी 2’चा ट्रेलर प्रदर्शित
जमिनीच्या वादातून भावकी मध्ये वाद एकमेकांवर कुऱ्हाडीने केला हल्ला.

नवी दिल्ली : दिवाळी सरता सरता देशभरात थंडीची चाहूल लागली आहे. दरम्यान कोरोनानंतर निर्बंधमुक्त सणामुळे यंदा फटाके फोडण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी दिल्लीत थंडी आणि प्रदूषणाचा स्तर वाढल्याचे दिसून येत आहे. देशभरात बहुतांश राज्यांत पावसाने उसंत घेतल्याने काही प्रमाणात थंडीची चाहूल लागली आहे. दिल्लीसह उत्तर भारत आणि मुंबईतही सायंकाळनंतर पारा उतरताना दिसत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील राज्यांमध्ये उत्तर प्रदेश-बिहारसह पावसाचा कोणताही अंदाज नाही. मात्र, या भागातील तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीचा कडाका जाणवत आहे. मात्र पुढील चार दिवस दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर ते हिमाचल या डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टीमुळे तापमानात घट दिसून येत आहे. याचबरोबर महाराष्ट्रातही पुढील 10 दिवस हवामान कोरडे राहिल. भारतीय हवामान खात्याच्या इशार्यानुसार, पुढील चार दिवस तामिळनाडू, केरळ, अंदमान-निकोबार, आंध्र प्रदेश, तेलंगणा, रायलसीमा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम आणि पश्‍चिम बंगालमध्ये हलका पाऊस पडणार आहे. या राज्यांमध्ये पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, आंध्र प्रदेशात आज पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये 31 ऑक्टोबरला पावसासोबत बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. डोंगराळ राज्यांमध्ये आधीच बर्फवृष्टी होत आहे, त्यामुळे तेथील तापमानात कमालीची घट होत आहे. त्याचबरोबर देशाच्या इतर भागात हवामान कोरडे राहील. उत्तर प्रदेश-बिहार आणि झारखंडमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. यामुळे छठ पूजेवर पावसाचे पावसाचे सावट नसल्याने छट पूजा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.

COMMENTS