आयोगाच्या मानांकनानुसार परीक्षांचे नियोजन करणार : सूरज मांढरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयोगाच्या मानांकनानुसार परीक्षांचे नियोजन करणार : सूरज मांढरे

नाशिक : केंद्रीय लोकसेवा आयोगाचे परिक्षा केंद्र नाशिक येथे सुरू करून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाने नाशिकच्या युवा वर्गाला मोठा दि

शिक्षक बँकेच्या निवडणुकीने दिले सव्वा लाखाचे उत्पन्न ; साडेआठशेवर उमेदवारी अर्ज दाखल
धर्मकार्य आणि साहित्यसेवा माणुसकीला बळ देईल ः प्रा. आदिनाथ जोशी
लातूरमध्ये पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीचा विक्रम; 60 कोटी 49 लाखांची वसुली

नाशिक : केंद्रीय लोकसेवा आयोगाचे परिक्षा केंद्र नाशिक येथे सुरू करून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाने नाशिकच्या युवा वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. येत्या ऑक्टोबर मध्ये होवू घातलेली ही परीक्षा आयोगाच्या मानांकनानुसार जिल्हा प्रशासन यशस्वी करून दाखवेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आयोगाचे उपसचिव एस.के.गुप्ता यांना दिली आहे.
नाशिक मध्ये पहिल्यांदाच केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून सिविल सर्विस पूर्व परीक्षा ही परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे उपसचिव एस.के.गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रशिक्षणादरम्यान बोलताना मांढरे बोलत होते.प्रशिक्षण घेण्यात आले.
ऑक्टोबर २०२१ मध्ये होऊ घातलेल्या परीक्षेसाठी नाशिकमध्ये एकूण १२ केंद्रे निश्चित आली असून साधारण ४ हजार ४०० इतक्या परीक्षार्थ्यांनी नाशिक हा परीक्षेसाठीचा केंद्र म्हणून पर्याय निवडलेला आहे. विशेष बाब म्हणजे परीक्षेसाठी दिव्यांग परीक्षार्थींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याबद्दलचे निर्देश श्री. गुप्ता यांनी यावेळी दिले आहेत. आयोगाकडून दर्शविण्यात आलेल्या अपेक्षांबद्दल जिल्हाधिकारी मांढरे यांनी यंत्रणा सज्ज असल्याबद्दलची ग्वाही दिली. निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे यांनी यावेळी आभार मानले.

दृष्टिक्षेपात प्रशिक्षण
ऑक्टोबर २०२१ मध्ये होणार केंद्रीय लोकसेवा आयोगाची नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदा पूर्व परिक्षा.
जिल्ह्यातून १२ परिक्षाकेद्रांची निवड
४ हजार ४०० विद्यार्थी देणार परिक्षा
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असेल स्वतंत्र व्यवस्था

COMMENTS