Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री सिध्दनाथ-देवी जोगेश्‍वरी शाही विवाह सोहळ्यास प्रारंभ

म्हसवड / वार्ताहर : राज्यातील अनेक भाविकांचे कुलदैवत व श्रध्दास्थान असलेले येथील श्री सिध्दनाथ व देवी जोगेश्‍वरी देवस्थानचा पारंपरिक शाही विवाह स

पर्यटन मंत्र्यांचा प्रतापगडावरून कडेलोट करण्याची गरज : आ. शशिकांत शिंदे
सातार्‍यात विवाहितेचा जाचहाट करून खून
खोडशीजवळ इनोव्हाची रिक्षाला जोराची धडक : गोटेतील 1 ठार

म्हसवड / वार्ताहर : राज्यातील अनेक भाविकांचे कुलदैवत व श्रध्दास्थान असलेले येथील श्री सिध्दनाथ व देवी जोगेश्‍वरी देवस्थानचा पारंपरिक शाही विवाह सोहळ्याचा शुभारंभ दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर बुधवार, दि. 26 रोजी मंदीरात पहाटे श्री ची घटस्थापना केल्यानंतर सकाळी वधू-वरास हळद लावण्याचा कार्यक्रम होताच सायंकाळी फटाक्याच्या आतषबाजीत सुमारे 10 तास सालकरी व मानकरी यांच्या मिरवणुकीचे दिवाळी मैदान झाले. कार्तिक प्रतिपदा ते मार्गशिर्ष महिन्यातील प्रतिपदा दरम्यानच्या एक महिन्याच्या कालावधीचा हा मंगलमय विविध धार्मिक उपक्रमांनी शाही विवाह सोहळा असतो.
बुधवारी दिपावली पाडव्यास पहाटे 5 वाजता मंदीराचे सालकरी गणेश गुरव त्यांची पत्नी सौ. सोनाली यांचे हस्ते श्री ची मंदीरातील मुख्य गाभार्‍या समोरील मंडपातील श्री म्हातारदेव बाबा यांच्या मुर्ती समोर घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता भाऊबिजेस श्रीच्या ऊत्सव मुर्तींना महिलांच्या हस्ते हळदी लावण्याचा कार्यक्रम हजारोच्या संख्येने उपस्थित कार्यक्रम संपताच दुपारी एक वाजता वधू-वरास स्नान घालण्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास महिलांची तोबा गर्दी झाली. सनई, चौघडा या मंगल वाद्याच्या सुरात पहाटेपासून दुपारी पर्यंत हा हळदी लावण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर श्रीच्या मुर्ती पुर्ववत गाभार्‍यात स्थानापन्न करण्यात आल्या. त्यानंतर भाविकांच्या नगरप्रदक्षणा नवरात्री उपवासा प्रारंभ करण्यात आला. सायंकाळी सहा वाजता मंदीरातून सालकरी पुजारी व मानकरी हे येथील राज बागेतील श्री म्हातारदेव मंदीरातील श्रीच्या भेटीस मिरवणूक मार्गस्थ झाले. या शाही विवाह निमित्त श्री म्हातारदेव यांची श्रीचा भेट होताच तेथून श्री सिध्दनाथ मंदीरपर्यंत निघालेल्या मिरवणूकीपुढे भाविकांनी ठिकठिकाणी फटाक्याची आतषबाजी करीत मिरवणुकीने स्वागत केले.

COMMENTS