Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये आयोजित कुस्ती स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

कराड / प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कराड शहरातील बैलबाजार येथे आयोजित कुस्ती स्पर्धेला कुस्ती प्रेमीं

एसटी आंदोलनात ठिणगी; इस्लामपूर डेपोतून वाटेगावला निघालेली एसटी बस अज्ञातांनी फोडली
जावळीतील मोहरे शिंदे गटाच्या गळाला; पदाधिकारी गेले मूळ शिवसैनिक पक्षातच
माण तालुक्यात नवजात अर्भकास फेकून दिल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल

कराड / प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कराड शहरातील बैलबाजार येथे आयोजित कुस्ती स्पर्धेला कुस्ती प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, अधिकराव चव्हाण, राहुल चव्हाण, भास्कर देवकर, धनाजी काटकर, इंद्रजीत गुजर, नानासाहेब पाटील, नितीन थोरात, शिवाजी मोहिते आदींसह सर्व कुस्तीप्रेमी यावेळी उपस्थित होते. या कुस्ती पाहण्यासाठी कराड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कुस्तीप्रेमी बैलबाजार ग्राउंडवर उपस्थित होते.
स्पर्धेनिमित्त अधिकराव चव्हाण म्हणाले, आपल्या भागात कुस्तीबद्दल आस्था निर्माण व्हावी, यासाठी अशा कुस्त्यांच्या स्पर्धांचे आयोजन केले गेले पाहिजे. आज इथे नंबर एकच्या कुस्तीसाठी दोन कुस्त्या लावल्या गेल्या होत्या. यामध्ये अक्षय मोहिते (बेलवडे बु।) व दिग्विजय जाधव (सुपने) हे दोघेही नंबर एकच्या कुस्तीमध्ये विजयी झाले आहेत. तसेच महिलांच्या कुस्तीलाही कुस्तीप्रेमींनी दाद दिली. यामध्ये मुळची कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील व सध्या शिवछत्रपती कुस्ती केंद्र सुपने येथे कुस्तीचा सराव करत असलेली अमृता चौगुले हे खेळाडू विजयी झाले.
लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत तसेच महिलांमध्येही कुस्तीबद्दल आस्था निर्माण व्हावी. यासाठी कुस्ती स्पर्धेचे आयोजन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते. कुस्ती स्पर्धेला कराड तालुक्यातील असंख्य कुस्तीप्रेमींनी हजेरी लावून चांगली दाद दिली, असेही अधिकराव चव्हाण यांनी बोलाताना स्पष्ट केले.

COMMENTS