Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड शहरासह तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

टावरवर चढून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जामखेड ः मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील दुसर्‍यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक बनत चालली असतांन

शिर्डी येथे ‘महापशुधन एक्सपो’ चे २४ ते २६ मार्च दरम्यान आयोजन
बेरोजगारांना रोजगाराची सुवर्णसंधी… नावनोंदणी करण्याची गरज
प्रवरेच्या कृषीदुतांचे पिंपळवाडीत स्वागत

जामखेड ः मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील दुसर्‍यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक बनत चालली असतांना देखील सरकारला मात्र घामही फूटत नाही. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मंगळवारी 31 ऑक्टोबर रोजी जामखेड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला.
तालूक्यातील नायगाव येथे चालू आंदोलनातुन उठून बाळासाहेब उगले या तरुणाने टावरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी समजूत काढत खाली उतरवत आत्महत्येपासून परावृत्त केले. तसेच सरकारला जागे करण्यासाठी काही दिवसांपासून जामखेडसह तालुक्यातील खर्डा आरणगाव आदी गावात साखळी उपोषण सुरू केले आहे. 30 ऑक्टोबर रोजी कॅन्डल मार्च काढण्यात आला होता, यामध्ये हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने शहरातून शांततेने रँलीद्वारे जाऊन तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. सरकारच्या वेळकाढू धोरणाविषयी तीव्र असंतोष निर्माण झाला असून समाज राज्यभर आक्रमक आंदोलन करतांना दिसत आहेत.

COMMENTS