पाच वर्षांत सहा लाख भारतीयांचा नागरिकत्वाचा त्याग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाच वर्षांत सहा लाख भारतीयांचा नागरिकत्वाचा त्याग

केंद्र सरकारची लोकसभेत माहिती ;नागरिकत्वासाठी सर्वाधिक अर्ज पाकिस्तानमधून

नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद मोदी सत्तेत आल्यानंतर गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक भारतीयांनी आपल्या नागरिकत्वाचा त्याग केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्य

Ahmednagar : जामीनावर असलेल्या आरोपीला गावठी कटयासह रंगेहात पकडले | LOKNews24
आ.ससाने कडून ग्रामीण भागातील रस्त्याची पाहणी
तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कारभार सिल्वर ओक, मातोश्री आणि सामना कार्यालयातून सुरू होता

नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद मोदी सत्तेत आल्यानंतर गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक भारतीयांनी आपल्या नागरिकत्वाचा त्याग केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल सहा लाख भारतीयांनी आपल्या नागरिकत्वाचा त्याग केल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली.
केंद्र सरकार एकीकडे नागरी कायद्याच्या माध्यमातून शेजारी देशातील नागरिकांना ज्यांचा धर्मांचा नावाखाली छळ होत असेल, अशा नागरिकांना भारतीय नागरिकत्व बहाल करतांना दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे भारतीय नागरिक आपल्या मूळ नागरिकत्वाचा त्याग करतांना दिसून येत आहे. परदेशी स्थायिक होण्यात वाढ होत असल्यामुळे अनेक जण आपल्या नागरिकत्वाचा त्याग करतांना दिसून येत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान यासंदर्भातली चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी यासंदर्भात लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरामध्ये या आकडेवारीचा समावेश आहे. या भारतीयांनी इतर देशाचं नागरिकत्व स्वीकारण्यासाठी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केल्याची माहिती देण्यात आली आहे. राय यांनी लेखी उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये 1 लाख 33 हजार भारतीयांनी आपल्या नागरिकत्वाचा त्याग केला. 2018 मध्ये हाच आकडा 1 लाख 34 हजार झाला. 2019मध्ये तो वाढून 1 लाख 44 हजारपर्यंत गेला. 2020मध्ये करोनाची साथ आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर असणारे निर्बंध, निरनिराळ्या देशांमध्ये लागू असलेले लॉकडाऊन या पार्श्‍वभूमीवर हा आकडा खाली घसरून थेट 85 हजार 248 पर्यंत आला. तर 2021 मध्ये निर्बंध हटवण्यात आल्यानंतर 30 सप्टेंबरपर्यंत भारतीय नागरिकत्वाचा त्याग केलेल्या नागरिकांचा आकडा 1 लाख 11 हजार इतका झाला आहे. आजपर्यंतची आकडेवारी पाहाता एकूण 1 कोटी 33 लाख 83 हजार 718 भारतीय नागरिक विदेशात स्थायिक झाल्याची माहिती राय यांनी या उत्तरात दिली आहे. एकीकडे नागरिकत्वाचा त्याग केलेल्या भारतीयांची संख्या लाखांमध्ये असली, तरी भारतीयत्वाचा स्वीकार केलेल्या नागरिकांची आकडेवारी देखील राय यांनी दिली. यामध्ये 2016 ते 2020 या पाच वर्षांमध्ये एकूण 4 हजार 177 विदेशी व्यक्तींना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहेत. एकूण 10 हजार 645 व्यक्तींनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज दाखल केले होते. यापैकी सर्वाधिक पाकिस्तान (7782), त्याखालोखाल अफगाणिस्तान (795), अमेरिका (227), श्रीलंका (205), बांगलादेश (184), नेपाळ (167) आणि केनिया (185) या देशातून भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज आले होते. सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार नियमावली जारी झाल्यानंतर भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करता येईल, असं राय यांनी सांगितलं. भारताच्या शेजारी असलेले पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या मुस्लिम बहुसंख्य देशांमधील हिंदु, शिख, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्‍चन यांना सीएएनुसार भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करता येणार आहे.

देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही
ोरोनाचा ओमिक्रॉन या विषाणूने खळबळ माजवली असून, जगातील 14 देशांत या व्हेरियंटचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले असले तरी भारतात अद्याप एकही रुग्ण ओमिक्रॉनचा आढळला नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मांडविया यांनी ही माहिती दिली आहे. या व्हेरियंट विषयी अधिक अभ्यास केला जात आहे. अद्याप देशात या व्हेरियंटचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असेही त्यांनी राज्यसभेत बोलताना स्पष्ट केले आहे.

COMMENTS