Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, मुलाचा फैसला उद्या

मुंबई / प्रतिनिधी : आयएनएस विक्रांत निधी घोटाळाप्रकरणी किरीट सोमय्यांचा अटकपूर्वी जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्यांच्

प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करु : ना. उदय सामंत
जावळीतील मोहरे शिंदे गटाच्या गळाला; पदाधिकारी गेले मूळ शिवसैनिक पक्षातच
आंघोळी करताना विजेचा धक्का बसून बालकाचा मृत्यू

मुंबई / प्रतिनिधी : आयएनएस विक्रांत निधी घोटाळाप्रकरणी किरीट सोमय्यांचा अटकपूर्वी जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी करण्यात येणार आहे. या सर्व प्रकरणावर आज सकाळी दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद पूर्ण झाला होता. मात्र, न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला होता. आता त्यावरील निकाल देण्यात आला. न्यायालयाने सोमय्यांचा दाखल करण्यात आलेला अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे आता किरीट सोमय्यांना अटक होणार का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना खा. संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांची विक्रांत फाईल्स उघडत, अनेक खळबळजनक आरोप केले होते. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदत निधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 11 एप्रिल म्हणजेच, आज सुनावणी झाली. न्यायालयाने निर्णय संध्याकाळपर्यंत राखून ठेवला होता. त्यात आता न्यायालयाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. तसेच नील सोमय्या यांच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता किरीट सोमय्या उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती समोर येत आहे.
………………..

COMMENTS