Solapur : करमाळा टेंभुर्णी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Solapur : करमाळा टेंभुर्णी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

दहा दिवसाच्या आत संबंधित दुरुस्तीची चौकशी करून नवीन दुरुस्ती सुरू न झाल्याससंबंधित अधिकाऱ्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून खड्ड्यात पुरणारकरमाळा ता

उपमुख्यमंत्री जेव्हा बॉम्ब फोडतील तेव्हा उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जेल मध्ये असतील – आ. रवी राणा 
पुण्याच्या विकास प्रकल्पासाठी केंद्र सरकार सहकार्य करणार : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
अहंकार सोडून विशेष अधिवेशन बोलवा… मनसेच्या आमदारांची मागणी


दहा दिवसाच्या आत संबंधित दुरुस्तीची चौकशी करून नवीन दुरुस्ती सुरू न झाल्यास
संबंधित अधिकाऱ्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून खड्ड्यात पुरणार
करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकरयांचा इशारा

   जातेगाव करमाळा टेंभुर्णी रस्त्यावर सध्या परतीच्या पावसानंतर खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून अनेक अपघात या मुळे होत आहेत संबंधित अपघातात अनेक प्रवाशांना आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे गेल्या वर्षी लाखो रुपयांचा खर्च करून संबंधित रस्त्याची दुरुस्ती केली होती परंतु,भ्रष्टाचाराने बरबटलेल्या कॉन्ट्रॅक्टरने निकृष्ट दर्जाची दुरुस्ती करून अगदी सहा महिन्याच्या आत संबंधित रस्त्यावर पुन्हा तेवढेच खड्डे पडले आहे .


  या अनुषंगाने  जातेगाव करमाळा टेंभुर्णी हा रस्ता दहा दिवसाच्या आत खड्डे बुजवून दुरुस्त न केल्यास आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरची सखोल चौकशी न केल्यास ज्या अधिकाऱ्यांच्या मार्फत या रस्त्याची देखरेख केली जाते त्या पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून संबंधित रस्त्यावरील खड्ड्यात पुरवण्याचे आंदोलन प्रहार केल्याशिवाय राहणार नाही या आशयाचे निवेदन आज करमाळा पीडब्ल्यूडी शाखा तसेच करमाळा पोलीस स्टेशनला देण्यात आली .यावेळी प्रहार संघटना करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर शहाजी डिकोले, शँकर डिकोले,अनेक प्रहार सैनिक उपस्थित होते…

COMMENTS