अहमदनगर शहरातून मोटार सायकल चोरणारे  चार गुन्हेगार जेरबंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर शहरातून मोटार सायकल चोरणारे चार गुन्हेगार जेरबंद

अहमदनगर : अहमदनगर शहरामधील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटार सायकल चोरून नेणारे गुन्हेगार कोतवाली पोलीसांकडुन जेरबंद फिर्यादी मोमिन तस्दीक मो

लाचखोर पोलिस व्हाईस डिव्हाईस घेऊन पळाला गुन्हा दाखल
ऑरगॅनिक केमिकल कंपनीस आग… गुप्ततेमुळे संशय बळावला
शूरवीर जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात

अहमदनगर : अहमदनगर शहरामधील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटार सायकल चोरून नेणारे गुन्हेगार कोतवाली पोलीसांकडुन जेरबंद फिर्यादी मोमिन तस्दीक मोमिन इद्रीस वय १ ९ वर्षे रा . जिल्हा परीषद शाळेजवळ मुकुंदनगर अहमदनगर यांची होन्डा ड्रिम युगा मोटार सायकल ही शनी चौकात भोला जिम जवळ हँन्डेल लॉक करुन पार्क केली असता ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्या करीता ती चोरुन नेली आहे वगैरे मााच्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं ६३/२०२२ भादवि कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे . सदर गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असताना पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , अहमदनगर शहरात मोटार सायकल चोरी करणारे आरोपी हे कायनेटीक चौक अहमदनगर येथे येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी गुन्हे शोध प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांना रवाना करुन खबरी मार्फत माहिती मिळालेल्या माहितीच्या आधारे कायनेटीक चौक अहमदनगर येथे सापळा लावून येथे विना क्रमांकाच्या दोन मोटार सायकली वरुन चार इसम मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांनी त्यांचे नाव व पत्ता विचारली असता त्यांनी त्यांचे नाव १ ) शुभम बबन भापकर वय २१ वर्ष रा गुंडेगाव ता नगर जि अ नगर २ ) कृष्णा बाबासाहेब गुंड वय २५ वर्ष रा मेहेरबाबा वेशी जवळ आरणगांव ता नगर ३ ) अभिषेक संतोष खाकाळ वय २० वर्ष रा संभाजी नगर व्हीआरडीई गेट आरणगांव ता नगर जि अ नगर ४ ) जालींदर अर्जुन आमले वय २१ वर्ष रा आमले मळा आरणगांव ता जि अहमदनगर असे असल्याचे सांगीतल्याने त्याच्याकडे मोटर सायकल बाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की , आम्ही अहमदनगर शहरातुन वेगवेगळ्या ठिकाणावरुन चार मोटर सायकल चोरी केलेल्या आहेत असे सांगीतले त्यावरुन कोतवाली पोलीस स्टेशन अभिलेखावर ( १ ) गु.र .नं. ६२ / २०२२ भादवि कलम ३७ ९ ( २ ) गु.र.नं. ६३/२०२२ भादवि कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे . त्यावरुन सदर चारही आरोपींना कोतवाली पो.स्टे.गु.र.नं. ६३ / २०२२२ भादवि कलम ३७ ९ दाखल गुन्हयात अटक करून त्यांना मा . न्यायालयापुढे हजर केले असता मा . न्यायालयाने त्यांना शुक्रवार दि २८/०१/२०२२ रोजी पावेतो पोलीस कस्टडी मंजुर केली आहे . तसेच सदरचे आरोपी पोलीस कस्टडी मध्ये असताना त्यांना विश्वासत घेवून विचारपुस केली असता सदर आरोपींनी दुर्गा देवी मंदीर , दळमंडई , ता.नगर येथे चोरी केले असले बाबत सांगीतल्याने सदर घडले प्रकाराबाबत कोतवाली पो.स्टे . गु.र.नं. ०५/२०२२ भादवि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे . तरी आरोपी नामे १ ) शुभम बबन भापकर वय २१ वर्ष रा गुंडेगाव ता नगर जि अ नगर २ ) कृष्णा बाबासाहेब गुंड वय २५ वर्ष रा मेहेरबाबा वेशी जवळ आरणगांव ता नगर ३ ) अभिषेक संतोष खाकाळ वय २० वर्ष रा संभाजी नगर व्हीआरडीई गेट आरणगांव ता नगर जि अ नगर ४ ) जालींदर अर्जुन आमले वय २१ वर्ष रा आमले मळा आरणगांव ता जि अहमदनगर यांचेकडुन ५५,००० / – रु किंच्या चार मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत . सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना / सलीम शेख करीत आहे .
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील ,अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल , उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे ,पोना योगेश भिंगारदिवे , पोना गणेश धोत्रे ,पोना योगेश कवाष्टे , पोना नितीन शिंदे , पोना सलिम शेख ,पोना संतोष गोमसाळे , पोकाँ अभय कदम , पोकाँ दिपक रोहकले , पोकाँ अमोल गाढे , पोकाँ सोमनाथ राउत , पोकाँ अतुल काजळे , व सायबर पोस्टेचे पोकाँ राहुल गुंडू , पोकाँ प्रशांत राठोड यांनी केली आहे.

COMMENTS