Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत ध्रुवला सहा पदके

संगमनेर/प्रतिनिधी ःअहमदनगर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने उत्कृश्ट कामगिरी करताना तीन सुवर्ण प

श्रीकृष्ण जीवनचरित्र सृष्टांची बाजू सांगणारे चिरंजीवचरित्र
*मराठा आरक्षणावर केंद्राची फेरविचार याचिका | सकाळच्या ताज्या बातम्या | LokNews24*
 गावोगावच्या शाळांना राजकारणाचा अड्डा बनवू नका ः भरत आंधळे

संगमनेर/प्रतिनिधी ःअहमदनगर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने उत्कृश्ट कामगिरी करताना तीन सुवर्ण पदकांसह सहा पदके मिळवली. जिल्हा क्रीडा कार्यालयाने आयोजित केलेली ही स्पर्धा भिंगार येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूलमध्ये पार पडली.
अकरा वर्षांखालील मुलांच्या गटात सर्वेश जाधव याने सुवर्ण तर चौदा वर्षांखालील गटात सोहम मेहेर याने रौप्यपदक मिळवले. सतरा वर्षांखाली मुलींच्या गटात गुंजन जोशीने सुवर्ण आणि तनिष्का वर्पेने रौप्य पदकाची कमाई केली. तर, 19 वर्षांखालील गटात सर्वदा बाणखेलेने सुवर्ण व आविश्री इंदाणीने रौप्य पदक मिळवले. या संपूर्ण स्पर्धेत ध्रुव ग्लोबलच्या स्केटिंग खेळाडूंनी तीन सुवर्ण व तीन रौप्यसह एकूण सहा पदकांची कमाई केली. क्रीडा प्रशिक्षक ज्ञानेश्‍वर भोत यांनी ध्रुवच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ.संजय मालपाणी, व्हा.चेअरमन गिरीश मालपाणी, प्राचार्या अर्चना घोरपडे व क्रीडा विभागप्रमुख गिरीश टोकसे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS