Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावमध्ये एकल महिलांचा फॅशन शो उत्साहात

जागतिक महिला दिनी गाजली महाराष्ट्राची हिरकणी

कोपरगाव प्रतिनिधी ः सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान व स्टारडम इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एकल महिलांचा

माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ ; गुन्हा दाखल
भविष्यात पुन्हा युती होईल का याचे काळच उत्तर देईल : रविंद्र बोरावके यांचे सूतोवाच
शेत जमीन व्यवहार फसवणुक प्रकरणी महेश संचेतीवर कोतवालीतही गुन्हा दाखल

कोपरगाव प्रतिनिधी ः सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान व स्टारडम इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एकल महिलांचा फॅशन शो नुकताच कलश मंगल कार्यालय कोपरगाव या ठिकाणी पार पडला. एकाल महिलांच्या प्रतिभेचा अविष्कार या स्पर्धेच्या निमित्ताने बघायला मिळाला. महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील ही पहिली आगळीवेगळी स्पर्धा ठरली आहे. 77 महिलांनी या सहभाग नोंदवला होता.  
प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता मालकर म्हणाल्या की, कोरोनाच्या काळात लहान वयातच वैधव्य आलेल्या महिलांची संख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. विधवा होण्याचं वय नसताना काळाने घाला घालून त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद हिरावून घेतला. गेल्या दोन वर्षापासून विविध उपक्रम प्रतिष्ठान राबवत आहे. त्यांना आत्मनिर्भर, स्वावलंबी होण्यासाठी विविध प्रकारची मदत केली जाते .हे सर्व होत असताना त्यांच्या मनाचा, भावनांचा विचार झाला पाहिजे. स्त्री म्हटले की साज शृंगार आलाच. परंतु विधवा म्हटले की समाजाला या गोष्टी मान्य नसतात. रुढी परंपरेचा बगडा हा तिच्यावर थोपावला जातो. जणू हा तिचा हक्कच हिरावून घेतला जातो. तिच्या चेहर्‍यावर आनंद दिसावा तिने स्वतःसाठी जगाव तिच्या प्रज्ञा आणि प्रतिभेचा आविष्कार इतरांना दिसावा. हे आनंदाचे क्षण टिपण्यासाठीच सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानने हा उपक्रम हाती घेतला व महिलांनी देखील याला भरभरून प्रतिसाद दिला.  रॅम्प वॉक करताना या सर्व एकल महिलांनी थोर क्रांतीकारक, समाज सुधारक महिला यांची वेशभूषा करून रॅम्प वॉक केला. त्यामध्ये ताराराणी रमाई, जिजाऊ, सावित्री राणी लक्ष्मीबाई, आनंदी जोशी या भूमिका अतिशय समर्पकपणे साकारल्यात. वेस्टर्न राउंड मध्ये देखील जुरींनी विचारलेल्या प्रश्‍नांची समर्पक उत्तरे महिलांनी दिली. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते या कार्यक्रमाने इतक्या भारावून गेल्या  की त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. सर्वच प्रेक्षक व प्रमुख अतिथी यांचे देखील डोळे पाणावलेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे असे रूपवते मॅडम म्हणाल्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्रा. छाया शिंदे राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते,  समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे, प्रतिमा कुलकर्णी एकल महिला पुनर्वसन समिती अकोल यावेळी उपस्थित होत्या. या स्पर्धेत हिरकणी महाराष्ट्राची मानकरी ठरल्या अकोल्याच्या सुरेखा मंडलिक, तसेच तसेच द्वितीय क्रमांकावर रश्मी शर्मा कोपरगाव तृतीय क्रमांक अश्‍विनी तावरे बारामती सोन्याचे नथ, पैठण्या, व इतर भरघोस अशी बक्षीसे सहभाहगी महिलांना मिळाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक गावित्र, आदिनाथ ढमाले, किरण शिंदे, श्रद्धा शिंदे, सुनीता ससाने सुधा ठोळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कोयटे व स्वाती मुळे यांनी केले. डॉक्टर गावित्र यांनी आभार प्रदर्शन केले.

COMMENTS