Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरीमध्ये हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ

राहुरी प्रतिनिधी ः राहुरी खरेदी विक्री संघात केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजने अंतर्गत हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ खरेदी विक्री संघांचे  कर्

काँग्रेस सांस्कृतिक विभाग शहर जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यांची निवड
जामखेड तालुक्याचा नवोदय विद्यालय परीक्षेत डंका
समृद्धी गायकवाडचे नवोदय परिक्षेत घवघवीत यश

राहुरी प्रतिनिधी ः राहुरी खरेदी विक्री संघात केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजने अंतर्गत हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ खरेदी विक्री संघांचे  कर्मचारी युसूफ बशीरभाई आत्तार ह्यांचे हस्ते आज करण्यात आला. केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजने अंतर्गत सन 2022-23या वर्षा करिता हरभरा खरेदी केंद राहुरी तालुका सह.खरेदी विक्री संघ लि राहुरी येथे सुरु झाले आहे.
ज्या शेतकर्‍याना आपले नाव नोंदणी करावी व स्वच्छ केलेला हरभरा विक्रीसाठी घेऊन येण्याचे आवाहन असे खरेदी विक्री संघाचे चेअरमन युवराज तनपुरे यांनी केले आहे. शासनाने धान्य खरेदीचे दर जाहीर केले आहे. हरभरा पिकासाठी रुपये 5335/- प्रती किंटल असा भाव आहे. तरी ज्या शेतकर्‍यांना आपला शेतमाल द्यावयाचा असेल त्यांनी आपले नावे नोंदविताना कागदपत्रे आधारकार्ड, बँक पासबुक प्रत (राष्ट्रीयकृत), 7/12 उतारा ऑनलाईन पीकपेरा 8अ पत्रक, मोबाईल क्रमांक व शेतकरी स्वत: उपस्थित रहावे नोंदणी झालेल्या शेतकर्‍यास नोंदणी कालावधी कमी असल्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी शेतकरी नोंदणी राहुरी येथील खरेदी विक्री संघाचे कार्यालयात सुट्टीचे दिवस सोडून व कार्यालयीन वेळेत केली जाईल. यावेळी संस्थेचे चेअरमन युवराज तनपुरे व्हॉइस चेअरमन संतोष पानसंबळ जेष्ठ संचालक अप्पासाहेब कोहकडे, संतोष विट्टल खाडे, मार्गदर्शक सुधाकर तनपुरे, बाजीराव भागवत पानसंबळ, भास्कर नालकर डॉ तनपुरे कारखान्याचे संचालक विजयराव दौले,शरद निरंजन पवार,आबासाहेब शेटे, विजय माळवदे,संचालक संदीप पवार,सचिव रमेश फुलसौंदर,शिवाजी गोंधळी ,शुभम काळे, मधु डुक्रे स्वप्नील कडू सुनील हारदे आदि उपस्थित होते.

COMMENTS