निवडणूक झाल्यावर पुण्यात शिवसेनेचा विजयी मेळावा घेणार… संजय राऊत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडणूक झाल्यावर पुण्यात शिवसेनेचा विजयी मेळावा घेणार… संजय राऊत

प्रतिनिधी : पुणे भाजपच्या विरोधाला न जुमानता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज वडगाव शेरीत शिवसैनिकांचा मेळावा घेत भाजपाला थेट आव्हा

शिवसेनेच्यावतीने महागाईच्या विरोधात सायकल रॅली
शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा पक्षाला “जय महाराष्ट्र’ (Video)
उदय सामंतांवरील हल्ल्याने राजकीय वातावरण तापले

प्रतिनिधी : पुणे

भाजपच्या विरोधाला न जुमानता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज वडगाव शेरीत शिवसैनिकांचा मेळावा घेत भाजपाला थेट आव्हान दिले. खूप प्रयत्नांनंतर मेळावा घेता आला. 

आज हा शिवसैनिकांचा मेळावा घेतला. मात्र उद्या शिवसेनेचा (Shivsena) विजयी मेळावा घेऊ, असे थेट आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिले. वडगाव शेरी येथील विठ्ठलांजन सभागृहात हा मेळावा सुरु आहे.

राऊत म्हणाले, पुण्यात शिवसेनेकडून चांगले काम होणार आहे. बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापनाच चांगलं काम करण्यासाठी केली. 

बाळासाहेबांनी सामान्य शिवसैनिकांना पुढे आणलं. भारतात शिवसैनिकांची एक मोठी ओळख आहे. मात्र भोसरीत शिवसेनेचा एकही निवडून आला नाही याची खंत आहे. मात्र आता पिंपरीत शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे हीच इथल्या शिवसैनिकांकडून अपेक्षा आहे. 

शिवसैनिक चांगले काम काम करत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्याचे फळ मिळणार यात शंका नाही. पुण्यात आणि पिंपरीत शिवसेनेचाच महापौर होणार असा दावा करत, याच ठिकाणी शिवसेनेचा विजयी मेळावा घेऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS