Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री हरिनारायण कोकाट सर यांचा सेवागौरव सोहळा संपन्न

तलवाडा प्रतिनिधी - माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर गढी येथील कार्यरत असलेले सह शिक्षक व ठाकर आडगाव चे भूमिपुत्र श्री.हरिनारायण कोकाट

निळवंडे लाभ क्षेत्रातील पाझर तलाव व लघु बंधारे भरून द्या
बेकायदेशीर काम बंद…मनपा कापणार कर्मचार्‍यांचा पगार
खरात आडगावमध्ये डुकरांचा बंदोबस्त करण्यावरून बेदम मारहाण

तलवाडा प्रतिनिधी – माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर गढी येथील कार्यरत असलेले सह शिक्षक व ठाकर आडगाव चे भूमिपुत्र श्री.हरिनारायण कोकाट सर यांचा ’सेवापुर्ती गौरव सोहळा’ संपन्न झाला तसेच या मध्ये श्री.रामदास शिंदेङ्गप्रा. बी.के. शेवाळे प्रा.शिवाजी पवळ यांच्या सुधा सेवा गौरव सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते रणवीर काका पंडित हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगन्नाथराव शिंदे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे कुमारराव ढाकणे माजी प्राचार्य पटेल सर तसेच प्राचार्य राठोड सर श्री.जगदाळे सर हे होते,जय भवानी व जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक आदरणीय दादांच्या आशीर्वादामुळे व आदरणीय साहेबांच्या कृपेने आम्ही सेवा करून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करू शकलो गेवराई तालुक्यातील शिक्षण संस्थेमुळे अनेक गोरीकरणांच्या मुलांना शिक्षण मिळाले व नोकर्‍या लागल्या,आजही अनेक गोरगरिबांची मुलं या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत यामुळेच खर्‍या अर्थाने गेवराई तालुक्यामध्ये शैक्षणिक क्रांती झाली असे म्हणता येईल आम्ही शिवछत्र परिवाराचे उपकार कधीही विसरणार नाहीत यापुढे ही चांगल्या प्रकारे कार्य करू अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच ठा.आडगाव चे माजी चेअरमन सुधाकर नाना कोकाट श्री.अरुण कोकाट पो.पाटील मधुकर कोकाट,लोभाजीराव कोकाट दामु अण्णा गाडे,व्हा.चेअरमन शेषराव पवार, बेलगुलवाडी चे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नंदकुमार पवार,माजी उपसरपंच साईकराम चव्हाण ग्रा.सदस्य अंगद कोकाट,महादेव कोकाट सर, युवा उद्योजक बाळू कोकाट, अजय कोकाट, रूद्रा घोलप,इत्यादींची उपस्थिती होती शेवटी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.

COMMENTS