Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री.शारदा वाचनालय ना. वि. देशपांडे ग्रंथभेट पुरस्काराने सन्मानित

उस्माननगर प्रतिनिधी - परिसरातील पंचक्रोशीत सुपरिचित आणि प्रसिद्ध असलेले श्री.शारदा वाचनालय उस्माननगर  यांना यंदाचा  ग्रंथमित्र ना.वि. देशपांडे ग

शरद पवारांचा आमदार सुनील शेळकेंना इशारा
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी हालचाली; सुसंवादासाठी प्रयत्न सुरु असल्याची शरद पवारांची माहिती
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सोलापुरात सत्याग्रह आंदोलन

उस्माननगर प्रतिनिधी – परिसरातील पंचक्रोशीत सुपरिचित आणि प्रसिद्ध असलेले श्री.शारदा वाचनालय उस्माननगर  यांना यंदाचा  ग्रंथमित्र ना.वि. देशपांडे ग्रंथभेट योजना पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते  पंचवीस हजार रुपयाची पुस्तके  , सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.  श्री शारदा वाचनालय, उस्माननगर या कंधार तालुक्यातील वाचनालयाला या वर्षी चा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्यामसुंदरराव जहागिरदार होते. तर व्यासपीठावर  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था संभाजीनगरचे पदाधिकारी सारंग टाकळकर, प्र. रा.शिराढोणकर,सुरेश देशपांडे, ग्रंथालय भारतीचे अध्यक्ष डॉ.राजशेखर बालेकर ,डॉ.अश्विनी वैष्णव, डॉ.जगदीश कुलकर्णी होते. वाचनालयाच्या वतीने अध्यक्ष श्यामसुंदराव जहागिरदार कार्यवाह बालमुकुंदराव कुलकर्णी यांनी पुरस्कार स्वीकारला.  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीने दरवर्षी एका वाचनालयाला पुरस्कार दिला जातो. पंचवीस हजार रुपयांची पुस्तके आणि सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. ना.वि.देशपांडे यांचे ग्रंथालय चळवळीतील कार्य व पुरस्काराविषयी ची माहिती डॉ.वैष्णव यांनी दिली मराठवाडा मुक्ती संग्रामात वाचनालये चळवळीची प्रमुख केंद्र होती  असे मनोगत डॉ.जगदीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. जीवनातील एक मिशन समजुन हे वाचनालय आम्ही चालवत आहोत या आमच्या प्रयत्नाला मानचा ना.वि देशपांडे पुरस्कार देऊन वाचनालयाचा सन्मान केला .  संस्था आहारी असुन भविष्यात वाचनालयाची भव्य वास्तू बांधण्याचा संकल्प असल्याचे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामसुंदराव जहागिरदार यांनी व्यक्त केले. डॉ. बालेकर, शिराढोणकर, मुकुंदराव कुलकर्णी, बोदेमवाड, डॉ. रविंद्र कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला  गावातील नागरिक, शिक्षक ,महिला,  परिसरातील वाचक वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते . या कार्यक्रमाला माजी आमदार व ग्रंथालय चळवळीचे प्रमुख गंगाधरराव पाटणे यांनी आवर्जुन भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल सूर्यकांत मालीपाटिल व ना.दी.पांचाळ  यांनी केले तर आभार सारंग टाकळकर यांनी मानले.

COMMENTS