Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाई बाजार येथे संयुक्त जयंती निमित्त संमोहनाचा समाज प्रबोधन पर कार्यक्रम

माहूर प्रतिनिधी - माहूर तालुक्यातील मौजे वाई बाजार येथे,राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची 196वी व विश्वरत्न महामानव डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच

अनोखा विवाह सोहळा; ‘सेवालया’ मधील एचआयव्ही संक्रमित पाच जोडप्यांचे शुभमंगल सावधान!
मविआत सांगलीच्या जागेवरून रस्सीखेच
महाविद्यालयीन तरुणीचा गळा आवळून खून

माहूर प्रतिनिधी – माहूर तालुक्यातील मौजे वाई बाजार येथे,राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची 196वी व विश्वरत्न महामानव डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंतीचे औचित्ये साधून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संमोहन तज्ञ डॉ,नवनाथ गायकवाड, पुणे यांचा अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे शुक्रवार दि.28एप्रिल रोजीरात्री आठ वाजता सहारा मंगल कार्यालयात दीपवंश बौद्ध विहार समिती व रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,
 या कार्यक्रमात विद्यार्थ्याकरिता आत्मविश्वास व एकाग्रता वाढवून लक्षात कसे ठेवावे, वेळेवर कसे आठवावे, परीक्षेची भीती कशी घालवावी, परीक्षा आली की वेळेवर ब्लॅक होतो, ताप येतो घाम सुटतो डोकं दुखते इत्यादी समस्येतून बाहेर कसे यावे याकरिता उपयुक्त आहे, त्याचप्रमाणे व्यक्तिगत समस्येत हाय वा लो बीपी, शुगर, अस्थमा, एलर्जी, मायग्रेन, डोकेदुखी, एंजाइटी, नकारात्मक विचार,निद्रानाश,भीती, नैराश्य, चिडचिडपणा, अडखळत बोलणे, कमी व जास्त वजनाची समस्या,  आत्महत्येचे विचार विचार,लैगिक व वैवाहिक समस्या, इत्यादी मनोशारिक आजारावर नियंत्रण मिळवणे व मुक्त होणे सहज शक्य असून या कार्यक्रमात अंतर्मनाची रचना समजल्यामुळे आपल्या मुलांना, पाल्यांना त्यांच्या समस्येतून बाहेर काढण्यास मदत करता येईल, तरी वाई  बाजार परिसरातील सर्व जनतेनी या कार्यक्रमाचा अवस्य लाभ घ्यावा असे कार्यक्रमाचे आयोजक व दिपवंश बौद्ध विहार समितीचे कार्याध्यक्ष पत्रकार सुभाष खडसे, व डॉ, बाबा डाखोरे, सामाजिक कार्येकर्ते यांनी आवाहन केले आहे.

COMMENTS