राजस्थानातील खांदेपालट

Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजस्थानातील खांदेपालट

काँगे्रसने जम बसलेल्या आपल्या विविध राज्यात खांदेपालट करायला सुरूवात केली असून, यामुळे भविष्यात काँगे्रसला मोठा फटका बसू शकतो. पंजाबमध्ये खांदेपालट क

दहशतवाद्यांचे स्लीपर सेल
सीमाप्रश्‍नाचा लढा !
केवळ प्रसिद्धीसाठी …

काँगे्रसने जम बसलेल्या आपल्या विविध राज्यात खांदेपालट करायला सुरूवात केली असून, यामुळे भविष्यात काँगे्रसला मोठा फटका बसू शकतो. पंजाबमध्ये खांदेपालट केल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँगे्रस पक्षाचा राजीनामा देत, स्वतंत्र पक्षाची घोषणा केली. शिवाय हा स्वतंत्र पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत आघाडी करण्याचे संकेत त्यांनी दिले आहे. त्यामुळे पंजाब सारख्या राज्यात आगामी निवडणुका जिंकणे काँगे्रसला अवघड जाणार आहे.

पंजाबसारखीच खांदेपालट आता राजस्थानात देखील होत आहे. त्यामुळे सचिन पायलट यांना झुकते माप देत असले, तरी काँगे्रसचे ज्येष्ठ नेते असलेले अशोक गेहलोत मात्र यामुळे नाराज असण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. राजस्थानच्या अशोक गहलोत सरकारमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामे सादर केलेत. त्यामुळेमंत्रिमंडळ फेररचेनेच्या प्रक्रियेला वेग आला आहे. 2023 च्या निवडणुकीतील फायदे लक्षात घेऊन हे फेरबदल केले जात आहेत. राजस्थानमध्ये 2023 मध्ये निवडणुका होणार असल्या तरी, गेहलोत आणि पायलट गटात सुरू असलेली भांडणे ज्या मर्यादेपर्यंत पोहोचली आहेत, ते पाहता गांधी घराणे जास्त सक्रिय झाले आहे. गेल्या वर्षी राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी बंडखोरी केली होती. पायलट आणि त्यांच्या 19 समर्थक आमदारांनी ही बंडखोरी केली होती. सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. राजस्थान हे काँग्रेसच्या हातात असलेलं मोठं राज्य आहे. या राज्यात भाजप पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर सचिन पायलट यांनाही मुख्यमंत्रीपदाची इच्छा असल्याचे सांगण्यात येत आहे.फेरबदलात गोविंद सिंग दोतासरा, हरीश चौधरी आणि रघु शर्मा यांच्या जागी नव्या चेहर्‍यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये दोन जाट आणि एका ब्राह्मण चेहर्‍याला संधी मिळू शकते. दोतासरा आणि हरीश चौधरी यांच्या जागी जाट चेहरे म्हणून रामलाल जाट, ब्रिजेंद्र सिंह ओला, हेमाराम चौधरी, नरेंद्र बुडानिया यांची नावे चर्चेत आहेत. अपक्ष महादेवसिंह खंडेला यांचेही नाव दावेदारांमध्ये आहे. रघु शर्माच्या जागी राजेंद्र पारीक, महेश जोशी, राजकुमार शर्मा हे दावेदार आहेत. हेमाराम, रामलाल जाट आणि ओला हेही गेहलोत यांच्यासोबत यापूर्वी मंत्री राहिले आहेत. महेश जोशी हे सुरुवातीपासूनच गेहलोत यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात आणि सध्या ते सरकारचे चीफ व्हिप आहेत. बसपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्यांमध्ये राजेंद्र सिंह गुढा यांचे नाव प्रमुख आहे. बसपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले केवळ सहा आमदार निवडणूक लढवत आहेत, मात्र उर्वरित पाच आमदारांना संसदीय सचिव बनवून किंवा राजकीय नियुक्त्या देऊन समाधान मानता येईल.
नव्या चेहर्‍यांना संधी देतांना सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यामध्ये कुठेतरी समन्वय साधणे गरजेचे आहे. तरच राजस्थानमध्ये, काँग्रेसला अच्छे दिन येऊ शकतात. मात्र पायलट आणि गेहलोत यांच्यामध्ये जर समन्वय साधला नाही, आणि दोघांमध्ये जर उभी फूट पडली, तर ती काँगे्रससाठी धोक्याची घंटा ठरू शकते. ाँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाच्या दृष्टीने गुजर चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. गुरमीत सिंग कुन्नर यांना कालवा परिसरातून संधी मिळू शकते. जाहिदा खान या पूर्वी संसदीय सचिव होत्या. डॉ.जितेंद्र गेहलोत यांच्या मागील कार्यकाळात ते ऊर्जामंत्री राहिले आहेत. गेहलोत सरकारमध्ये सध्या 13 जिल्ह्यांतून एकही मंत्री नाही. उदयपूर, प्रतापगढ, डुंगरपूर, भीलवाडा, श्री गंगानगर, हनुमानगड, चुरू, झुंझुनू, सिरोही, ढोलपूर, टोंक, सवाई माधोपूर आणि करौली जिल्ह्यात अद्याप एकही मंत्री नाही. या जिल्ह्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. सचिन पायलट कॅम्पमधून सुमारे 4 ते 5 मंत्री केले जाण्याची शक्यता आहे. पायलट कॅम्पमधून मुरारीलाल मीना, दीपेंद्र सिंह शेखावत, ब्रिजेंद्र सिंह ओला, हेमाराम चौधरी, रमेश मीणा हे मंत्री होण्याची शक्यता आहे.

COMMENTS