Homeताज्या बातम्याविदेश

X यूजर्ससाठी धक्का! पोस्ट करण्यासाठी मोजावे लागणार पैसे

गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. मात्र आता एलन मस्क यांनी याला दुजोरा दिला आहे. कंपनीच्या नफ्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे असं कंपनीने

जैव अर्थव्यवस्थेची भुमिका ग्रामिण विकासासाठी महत्वपुर्ण : श्रीमती उज्वला बावके-कोळसे
महाआयटीच्या कामावरून आमदार तांबे आक्रमक
सौरऊर्जेत भारताने गाठला 100 गिगावॅट क्षमतेचा टप्पा

गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. मात्र आता एलन मस्क यांनी याला दुजोरा दिला आहे. कंपनीच्या नफ्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे असं कंपनीने म्हटले आहे. आता X वर पोस्ट करण्यासाठी देखील पैसे आकारले जातील. यापुढे ट्विटरवर (X )मोफत मिळणार नाही. ज्यामध्ये पोस्ट ,रिपोस्ट, बुकमार्कसाठी वापरकर्त्यांना वर्षाभरासाठी किमान १ डॉलर इतकी किंमत मोजावी लागणार आहे . जर तुम्हीचे ट्विटरवर आधीपासून अकाउंट असेल तर भारतात प्रीमियम प्लानची ​​किंमत ६५० रूपये आहे. ट्विटर म्हणजेच ‘x’नं एका पोस्टमध्ये म्हटले आहे की , १७ ऑक्टोबर २०२३ पासून आम्ही ‘Not a Bot’च्या नवीन सबस्क्रिप्शनची चाचणी सुरू केलीय. X वर सुमारे २० ते ३० लाख फेक अकाउंट आहेत. त्यामुळे स्पॅम वापरकर्ते कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे स्कॅमर आणि बॉट्स दूर करण्यात मदत करेल. यासाठी कंपनीने ही योजना आणली आहे. मात्र ही बातमी समोर आल्यापासून सोशल मीडियावर लोक X (ट्विटर) बद्दल नाराजी व्यक्त करत आहेत.

COMMENTS