Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाडिक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मिळाला पेटंटचा बहुमान

इस्लामपूर / प्रतिनिधी : आधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांची योग्य सांगड घालत नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच नानासाहेब मह

विक्रम लँडरचे चंद्रावर दुसर्‍यांदा सॉफ्ट लँडिंग
कळंबी येथे विजेच्या तारा येतायत हाताला; शेतकर्‍यांचे जीव मुठीत घेऊन कामकाज; ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात
मार्चअखेर कोल्हापूर शहराला मिळणार पाईपलाईनद्वारे स्वयंपाकाचा गॅस

इस्लामपूर / प्रतिनिधी : आधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांची योग्य सांगड घालत नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण प्रकल्पासाठी पेटंट मिळाले. ड्युएल मास्टर सिलिंडर इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टिम या विषयावरील संशोधनासाठी पेटंटचा बहुमान मिळाला.
ऑटोमोबाईल इंडस्ट्री,मायनिंग, मटेरियल हेंडलींग इ. क्षेत्रांमध्ये या संशोधनाचा उपयोग होणार आहे. विशेषतः प्रकल्पामध्ये वापरलेल्या ’टोमॅटीक ब्रेकिंग सिस्टीम’ या कार्यप्रणालीमुळे वाहनांच्या होणार्‍या अपघातांवर नियंत्रण मिळवता येणार आहे. प्राचार्य महेश जोशी, प्रा. सी. बी. पाटील, प्रा. रुपेश फोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कु. प्रसाद यादव, कु. अक्षय कांबळे, कु. हमीदा जमादार या विद्यार्थ्यांनी प्रकल्प निर्मितीसाठी परिश्रम घेतले. संस्थेचे सचिव राहुल महाडिक यांनी या प्रकल्पांतर्गत योगदान देणार्यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना राहुल महाडिक म्हणाले, विविध प्रकल्पांच्या निर्मितीसाठी महाविद्यालयाने योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक वृत्तीला वाव मिळत आहे. पेटंटच्या माध्यमातून संस्थेला मिळालेला बहुमान प्रशंसनीय आहे. राष्ट्रीय स्तरावर टॅलेंट सिध्द करत असताना महाविद्यालयांमध्ये कार्यरत असणार्‍या ’रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ तसेच ’इन्स्टिट्यूट इनोव्हेशन सेल’ यांच्या सखोल मार्गदर्शनामुळे प्रोजेक्ट प्रात्यक्षिकांबरोबरच विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना चालना मिळाली, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी यांनी दिली.
अभ्यासक्रमांतील विषयांबरोबरच विद्यार्थी तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण व्हावेत. यासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांचा मोठा फायदा होत आहे, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. वर्मा यांनी व्यक्त केले.
उपप्राचार्य प्रा. निलेश साने, विभागप्रमुख प्रा. दत्तात्रय पाटील, प्रा. जाविद तांबोळी, ट्रेनिंग प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. अमोल पाटील यांच्यासह मेकॅनिकल विभागातील सर्व स्टाफ उपस्थित होते.

COMMENTS